फोटोतील या चिमुकलींना ओळखलंत का? दोघीही आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, बॉलिवूडवर करत आहेत राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 01:57 PM2023-09-21T13:57:18+5:302023-09-21T13:58:32+5:30

फोटोत दिसणाऱ्या चिमुकल्या आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

karishma kapoor kareena kapoor childhood photo have you recognize the actress | फोटोतील या चिमुकलींना ओळखलंत का? दोघीही आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, बॉलिवूडवर करत आहेत राज्य

फोटोतील या चिमुकलींना ओळखलंत का? दोघीही आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री, बॉलिवूडवर करत आहेत राज्य

googlenewsNext

बॉलिवूडमधील अनेक किस्से आणि आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय फॅमिलींपैकी कपूर फॅमिली ही एक आहे.गेली कित्येक वर्ष कपूर फॅमिलीतील अनेक पिढ्यांनी मनोरंजन विश्वात काम करत आहेत. सध्या कपूर फॅमिलीतील दोन चिमुकलींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्या सख्या बहिणी आहेत. या चिमुकल्यांनी अभिनय आणि सौंदर्याने ९० चं दशक गाजवलं. त्यांच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत. आज या चिमुकल्या बॉलिवूडवर राज्य करत आहेत. फोटोतील या चिमुकल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून करिश्मा कपूर आणि करीना कपूर आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा आज ४३वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने करिश्माने लाडक्या बहिणीसाठी खास पोस्ट केली आहे. करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करीनाबरोबरचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "नेहमीच तुझ्या बाजूने...कारण तू बेस्ट आहेस...लव्ह यू" असं कॅप्शन दिलं आहे. 

करीश्माने १९९१ साली प्रेम कैदी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'कुली नं १', 'अनारी', 'राजा बाबू', 'दिल तो पागल है', 'हम साथ साथ है' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. २००३ साली तिने संजय कपूरबरोबर लग्न केलं होतं. पण मतभेदांमुळे २०१६ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. तिला दोन मुलं आहेत. 

तर करीनाने २००० साली 'रेफ्युजी' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. करीनाचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. २०१२ साली सैफ अली खानशी लग्न करत करीना पतौडी खानदानची सून झाली. तिला तैमुर आणि जेह ही दोन मुले आहेत. 

Web Title: karishma kapoor kareena kapoor childhood photo have you recognize the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.