कार्तिक आणि श्रुतीने कोल्हापूरी स्टाईलमध्ये साजरा केला व्हॅलेंटाइन्स डे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 06:30 AM2019-02-13T06:30:00+5:302019-02-13T06:30:00+5:30
सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतील गोंडस आणि सुंदर जोडी असलेली कार्तिक आणि श्रुती यांनी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ अगदी हटके पद्धतीने साजरा केला.
प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला खूप महत्त्व असते. कधी ना कधी प्रेम या शब्दाशी आपला संबंध आलेला असतो किंवा येणार असतो. प्रेम व्यक्त करायला कोणता विशिष्ट असा एखादा दिवसच असावा असे नाही असे अनेकांचे मत जरी असले तरी प्रेम व्यक्त करायला भाग पाडणारा व्हॅलेन्टाईन्स डे हा दिवस अनेकजण आनंदाने, उत्साहाने साजरा करतात.
संपूर्ण जगात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने अनेकांची प्रेम कहाणी आणखी फुलते. प्रेमाला वयाचे, रुपाचे आदीं गोष्टींचे बंधन नसते आणि करियरचही नसते. एकमेकांच्या करियरचा, आवडी-निवडीचा आदर ठेवून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकते आणि हे सिद्ध करुन दाखवले बॉक्सर आणि शास्त्रीय गायकाच्या प्रेमळ जोडी जे नेहमीच म्हणतात की ‘सारे तुझ्याचसाठी’.
सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतील गोंडस आणि सुंदर जोडी असलेली कार्तिक आणि श्रुती यांनी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ अगदी हटके पद्धतीने साजरा केला. त्यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच ‘व्हॅलेंटाइन्स डे’ असल्यामुळे त्यांच्यातील प्रेमाच्या भावना या अजून सुंदर तऱ्हेने फुलणार यात शंकाच नाही.
कोल्हापूरमधील ‘रंकाळा’ या नयनरम्य आणि शांत ठिकाणी कार्तिक आणि श्रुतीने एकमेकांसोबत वेळ घालवला. मनमोकळा संवाद साधून रंकाळा येथील चटपटीत चॅटची चव देखील चाखली. तसेच व्हॅलेन्टाईन्स डे गिफ्ट म्हणून कार्तिकने श्रुतीला ‘कोल्हापूरी ठुशी’ भेट देऊन तिला सरप्राईज केले. अशा छोट्या-मोठ्या क्षणांनी कार्तिक आणि श्रुतीचा व्हॅलेन्टाईन्स डे सुंदर आणि स्पेशल बनला.
कोल्हापुरी स्टाईलने प्रेमाचा दिवस साजरा करुन कार्तिक आणि श्रुतीने प्रेम व्यक्त करण्याची नवीन स्टाईल प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे.