अन् ‘चांदनी’ला चंद्र दिसावा म्हणून पायलटने फिरवले होते विमान, मजेदार आहे श्रीदेवींच्या ‘करवा चौथ’चा किस्सा

By रूपाली मुधोळकर | Published: November 4, 2020 11:31 AM2020-11-04T11:31:58+5:302020-11-04T11:33:38+5:30

श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण त्या सुद्धा करवा चौथ व्रत अगदी भक्तिभावाने करायच्या. त्यांच्या या करवा चौथच्या व्रताबद्दलचा एक किस्सा आजही ऐकवला जातो.

karwa chauth 2020 when sridevi demand to pilot to turn the plane because she wanted to break her fast | अन् ‘चांदनी’ला चंद्र दिसावा म्हणून पायलटने फिरवले होते विमान, मजेदार आहे श्रीदेवींच्या ‘करवा चौथ’चा किस्सा

अन् ‘चांदनी’ला चंद्र दिसावा म्हणून पायलटने फिरवले होते विमान, मजेदार आहे श्रीदेवींच्या ‘करवा चौथ’चा किस्सा

googlenewsNext
ठळक मुद्देपहिला किस्सा ‘इंग्लिश विंग्लिश’च्या शूटींगदरम्यानचा आहे. न्यूयॉर्कमध्ये श्रीदेवी या सिनेमाचे शूटींग करत होत्या.

पतीच्या दिघार्युष्यासाठी विवाहिता करतात ते व्रत म्हणजे करवा चौथ. रात्री चंद्राचे आणि पतीचे दर्शन घेतल्यानंतर विवाहिता त्यांचे निर्जल व्रत सोडतात. बॉलिवूडच्या अनेक नट्या अगदी भक्तिभावाने हे व्रत करतात. श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण त्या सुद्धा हे व्रत अगदी भक्तिभावाने करायच्या. त्यांच्या या करवा चौथच्या व्रताबद्दलचा एक किस्सा आजही ऐकवला जातो. होय, करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी त्यांनी थेट विमानाच्या पायलटकडे खास विनंती केली होती.

श्रीदेवींनी चित्रपटात अनेक दमदार, ग्लॅमरस भूमिका साकारल्या. पण रिअल लाईफमध्ये त्या अतिशय सामान्य व कुटुंबवत्सल महिला होत्या. आपल्या घरी येणा-या प्रत्येक पाहुण्याचे त्या अतिशय अदबीने स्वागत करायच्या. पती आणि मुलींची प्रचंड काळजी घ्यायच्या. दरवर्षी पती बोनी कपूर यांच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत करायच्या. याबद्दलचे दोन किस्से प्रसिद्ध आहेत. 

पहिला किस्सा ‘इंग्लिश विंग्लिश’च्या शूटींगदरम्यानचा आहे. न्यूयॉर्कमध्ये श्रीदेवी या सिनेमाचे शूटींग करत होत्या. बोनी कपूरही त्यांच्यासोबत होत्या. या चित्रपटाच्या सेटवरच श्रीदेवींनी करवा चौथचे व्रत साजरे केले होते. सेटवर संपूर्ण रितीरिवाजाने त्यांनी हा उपवास सोडला होता.
एकदा विमानात प्रवास करताना श्रीदेवींनी करवा चौथचा उपवास सोडला होता. श्रीदेवी व पती बोनी कपूर मॅक्सिकोवरून लॉस एंजिल्सला जात होते. रात्रीची फ्लाईट होती. विमानात चंद्र कसा दिसणार आणि श्रीदेवी आपला निर्जल उपवास कसा सोडणार? असा प्रश्न बोनी कपूर यांना सतावत होता. पत्नीच्या काळजीने ते जरा चिंतेत होते. पण श्रीदेवींनी एक ग्लास पाण्यासोबत उपवास सोडण्याचा निर्णय घेतला होता.

अर्थात त्याआधी त्यांना चंद्राचे दर्शन घ्यायचे होते. असे म्हणतात की, त्यावेळी श्रीदेवींनी विमानाच्या पायलटकडे मदत मागितली होती. फक्त काही क्षण विमान अशा दिशेने वळव जेणेकरून मला चंद्र दिसेल, अशी विनंती त्यांनी विमानाच्या पायलटला केली होती. पायलटने श्रीदेवींची ही विनंती मान्य करत, त्यांना चंद्राचे दर्शन घडवले होते. विमानाच्या खिडकीतून चंद्राचे आणि सोबत पतीचे दर्शन घेत श्रीदेवींनी त्यावेळी करवा चौथचा उपवास सोडला होता.  

Web Title: karwa chauth 2020 when sridevi demand to pilot to turn the plane because she wanted to break her fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.