गुन्हेगार जगाची सफर घडविणारी 'कश्मकश', पीडितांची व्यथा पाहून जाल हेलावून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 07:03 PM2020-02-27T19:03:17+5:302020-02-27T19:05:34+5:30
गुन्हेगार जगताची सफर घडविणारी 'कश्मकश' वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
गुन्हेगार जगताची सफर घडविणारी 'कश्मकश' वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही सीरिज हंगामाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे. या नवीन संग्रहात ५ स्वतंत्र कथांचा समावेश असून याच्या प्रत्येक भागात आधुनिक युगात घडणाऱ्या गुन्ह्यांचा वेध, योग्य व अयोग्य यांची निवड करताना पीडित ज्या स्थितीतून जातात त्यावरील भाष्य केले जाणार आहे. या सीरिजमध्ये शरद मल्होत्रा, अंजुम फकीह, एजाज खान, अभिषेक कपूर, अबीगैल पांडे, लविना टंडन आणि वाहबीज दोराबजी हे कलाकार दिसणार आहेत.
पीडित व्यक्तीच्या दृष्टीने कश्मकश मांडली असून त्यामध्ये अलीकडच्या आधुनिक युगातील सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
याबद्दल शरद मल्होत्रा म्हणाला की, कश्मकश कोणताही उपदेश न देता धडा शिकवते, आणि हेच या कार्यक्रमाचे यश म्हटले पाहिजे.
एजाज खानने सांगितले की, कश्मकश ही एक अभिनव मालिका असून या माध्यमातून लक्षवेधी पद्धतीने गुन्ह्यांची कथा सादर करण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम बहुमोल ठरतो. या कार्यक्रमाचे दोन शेवट तो ताजा ठेवतात. एखाद्याचा निर्णय किंवा कृती आधुनिक पद्धतीने व्यक्त करण्यात आल्याने आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनावर त्याचा कसा प्रभाव पडतो याचे यात दर्शन घडते.
वाहबीज दोराबजी म्हणाली की, या शो’मधील गुन्हेविषयक कथा आपल्या सभोवताली जे घडते त्याविषयी सजगता निर्माण करतात. याचे पर्यायी शेवट अभिनव आहेत. त्यामुळे प्रेक्षक कथानकात गुंतत जाईल. मी या शो’चा भाग असल्याचा आनंद वाटतो, प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे.