इफ्फी २०१५ आणि युनेस्कोच्या फेलिनी अवॉर्ड स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’
By Admin | Published: November 18, 2015 01:03 AM2015-11-18T01:03:39+5:302015-11-18T01:03:39+5:30
भारतीय अभिजात संगीतावर आधारित असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकविला आणि मराठीला सुखद नव्हे, तर ‘सुरेल’ दिवस
भारतीय अभिजात संगीतावर आधारित असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकविला आणि मराठीला सुखद नव्हे, तर ‘सुरेल’ दिवस
आले, अशी चर्चा मराठी चित्रपटविश्वात रंगू लागली. रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाची गोव्यात दरवर्षी रंगणाऱ्या मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात निवड झाल्यानंतर या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. इफ्फी २०१५ आणि इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अॅण्ड आॅडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी), पॅरिस आणि युनेस्को यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाच्या फेलिनी पुरस्काराच्या स्पर्धेसाठी ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे भारतातील हे पहिले वर्ष असून, इफ्फी २०१५मधील एकूण ११ आंतरराष्ट्रीय चित्रपटांची यासाठी निवड करण्यात आली आहे; ज्यात ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचा समावेश आहे.
या निवडीबाबत दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाला, ‘अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या स्पर्धेत ‘कट्यार’ची निवड होणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. हा केवळ या चित्रपटाचा सन्मान नसून तो भारतीय शास्त्रीय संगीताचा, नाट्यसंगीताचा त्याचबरोबर पुरुषोत्तम दारव्हेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, प्रभाकर पणशीकर या दिग्गजांच्या कार्याचा सन्मान आहे. या निवडीचं श्रेय मी या चित्रपटासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या माझ्या सर्व कलावंत, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्यांना देतो.’