काय सांगता! पतीसोबत एकाही नाही अन् सासऱ्यांसोबत ३-४ सिनेमात कतरिना कैफने केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 06:23 PM2021-12-09T18:23:25+5:302021-12-09T18:36:05+5:30

katrina kaif and vicky kaushal wedding :शाम कौशल (sham kaushal) अनेक वर्ष इंडस्ट्रिचा भाग आहेत. त्यानी 80 च्या दशकात आपल्या करिअरला सुरुवात केली.

katrina kaif and vicky kaushal wedding : do you know katrina kaif had worked with vicky kaushal fathe sham kaushal | काय सांगता! पतीसोबत एकाही नाही अन् सासऱ्यांसोबत ३-४ सिनेमात कतरिना कैफने केलंय काम

काय सांगता! पतीसोबत एकाही नाही अन् सासऱ्यांसोबत ३-४ सिनेमात कतरिना कैफने केलंय काम

googlenewsNext

बॉलिवूड दिवा कतरिना कैफने (Katrina Kaif) अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र अभिनेत्री अद्याप विकी कौशलसोबत (Vicky kaushal) स्क्रीन शेअर करताना दिसलेली नाही. चित्रपटात विकी (Vicky kaushal)-कतरिना (Katrina Kaif) एकत्र कधी दिसणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कतरिनाने विकी कौशलच्या  (Katrina Kaif) वडिलांसोबत म्हणजेच तिचे सासरे शाम कौशल (sham kaushal ) यांच्यासोबत काम केले आहे.


कतरिना कैफने (Katrina Kaif) सासऱ्यांसोबत काम केले आहे, शाम कौशल अनेक दशकांपासून शोबिझ इंडस्ट्रीचा एक भाग आहे. ते स्टंट कॉर्डिनेटर आहेत. त्यानी 80 च्या दशकात आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानी अनेक स्टार्सचे स्टंट सीन कोरिओग्राफ केले आहेत. ज्यामध्ये सलमान खान, शाहरुख खान, हृतिक रोशन, जॅकी श्रॉफ यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. त्यानी होणारी सून कतरिनाच्या धूम ३, जब तक है जान, फँटम, राजनीति या चित्रपटात काम केले आहे.


फँटममध्ये  शाम कौशल यांच्या देखरेखीखाली स्टंट सीक्वेन्स केला होता. रिपोर्ट्सनुसार, शाम कौशलला चित्रपटाच्या एका खास स्टंट सीक्वेन्समध्ये कतरिना कैफला लपवायचे होते. बॉडी डबलचा वापरा करायचा होता. मात्र अभिनेत्रीला हे मान्य नव्हते. RAW ची एजंट बनलेल्या कतरिना कैफने बॉडी डबलचा वापर करण्यास नकार दिला. या चित्रपटाचे स्टंट कतरिनाने स्वतः केले होते.

Web Title: katrina kaif and vicky kaushal wedding : do you know katrina kaif had worked with vicky kaushal fathe sham kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.