लग्नानंतर विकी कौशल नाही तर सलमान खानसोबत दिल्लीला रवाना होणार कतरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 06:12 PM2021-12-18T18:12:01+5:302021-12-18T18:12:38+5:30

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) नुकतेच राजस्थानमध्ये ९ डिसेंबर रोजी लग्नबेडीत अडकले.

Katrina Kaif appeared in Delhi with Salman Khan, not Vicky Kaushal after marriage | लग्नानंतर विकी कौशल नाही तर सलमान खानसोबत दिल्लीला रवाना होणार कतरिना कैफ

लग्नानंतर विकी कौशल नाही तर सलमान खानसोबत दिल्लीला रवाना होणार कतरिना कैफ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल नुकतेच राजस्थानमध्ये ९ डिसेंबर रोजी लग्नबेडीत अडकले. हे जोडपे नुकतेच मुंबईत परतले असून सतत चर्चेत येत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. ते दोघंही लग्नानंतर ब्रेक न घेता कामावर रूजू होणार आहेत. कतरिना लवकरच सलमानसोबत 'टायगर ३'च्या शूटिंगसाठी १५ दिवसांच्या शेड्यूलवर जाणार आहे.

बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ लवकरच सलमान खानसोबत आगामी चित्रपट 'टायगर ३'चं शूटिंग दिल्लीत सुरू करणार आहे. या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग आधीच झाले आहे. आता पुन्हा कतरिना आणि सलमान या सुपरहिट फ्रँचायझीवर काम करत आहेत. याआधी कतरिना आणि सलमानने रशिया, तुर्की, ऑस्ट्रेलिया आणि मुंबईत या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. 'टायगर ३' आता जवळपास अंतिम टप्प्यात असून हे दोघं जानेवारीच्या मध्यापासून दिल्लीत चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या भागाचे शूटिंग करणार आहेत. दिल्लीत जवळपास १५ दिवस या चित्रपटाचे शूटिंग चालणार असल्याचे समजते आहे.

लग्नानंतर विकी कौशलने देखील केली कामाला सुरूवात
त्यानंतर आता विकी कौशलने आपला एक सेल्फी शेअर केला आहे. तो लग्नानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतो आहे. फोटो शेअर करत त्याने पहिला चहा मग काम असे कॅप्शन दिले आहे. 
 

Web Title: Katrina Kaif appeared in Delhi with Salman Khan, not Vicky Kaushal after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.