कतरिना कैफला कसा वाटला विकीचा 'तौबा तौबा'? म्हणाला, "ती मला बाराती डान्सर समजायची..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 09:17 AM2024-07-10T09:17:38+5:302024-07-10T09:18:49+5:30
विकीने नुकतंच बायकोची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं.
विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'तौबा तौबा' डान्स सध्या चांगलाच व्हायरल होतोय. प्रत्येक जण यावर डान्स करण्याचा प्रयत्न करतोय. आगामी 'बॅड न्यूज' सिनेमातील 'तौबा तौबा' हे पहिलं गाणं रिलीज झालं आणि विकी कौशलने त्याच्या डान्स मूव्ह्जने सर्वांना आश्चर्यचकीत केलं. अगदी हृतिक रोशननेही त्याची स्तुती केली. पण विकीचा हा डान्स कतरिनाला (Katrina Kaif) कसा वाटला याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विकीने नुकतंच बायकोची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं.
'फिल्म कम्पॅनियन'ला दिलेल्या मुलाखतीत विकी म्हणाला, "मला तेव्हाच बरं वाटलं जेव्हा कतरिनाने माझा डान्स अप्रुव्ह केला. ती चांगलं केलंस म्हणाली आणि मी थँक्यू म्हणालो. कारण कतरिना नेहमी मला म्हणायची की तुला डान्स आवडतो माहितीये पण तू बाराती डान्सर आहेस प्रशिक्षित डान्सर नाही. पण यावेळी ती खूश आहे कारण तिला माझे हावभाव, मूव्ह्ज आणि अॅटिट्यूड खूप आवडला."
कतरिना स्वत: टॉप क्लास डान्सर आहे. 'कमली', 'शीला की जवानी', 'इश्क शावा' या तिच्या काही गाण्यांमध्ये तिने कमालीचा डान्स केला आहे. त्यामुळे कतरिनाकडून स्तुती ऐकणं ही विकीसाठी मोठी गोष्ट आहे.
विकी कौशलचा 'बॅड न्यूज' 19 जुलै रोजी रिलीज होत आहे. यामध्ये तृप्ती डिमरी आणि एमी विर्कही आहेत. विकी आणि तृप्तीच्या केमिस्ट्रीने सध्या सोशल मीडियावर आग लावली आहे. सिनेमाचाही ट्रेलरही हटके असून सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.