बापरे..! कतरिना कैफनं सलमान खानचा दाबला गळा, भर शूटमधून निघून गेला अभिनेता, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:46 PM2022-02-07T12:46:55+5:302022-02-07T12:47:41+5:30

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खान (Salman Khan)चा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

Katrina Kaif strangles Salman Khan, the actor left the shoot, watch the video | बापरे..! कतरिना कैफनं सलमान खानचा दाबला गळा, भर शूटमधून निघून गेला अभिनेता, पाहा व्हिडीओ

बापरे..! कतरिना कैफनं सलमान खानचा दाबला गळा, भर शूटमधून निघून गेला अभिनेता, पाहा व्हिडीओ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतीच अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)सोबत लग्नबेडीत अडकली. तेव्हापासून ती तिच्या लग्नामुळे चर्चेत येत असते. विकी कौशलसोबत तिचे लग्न आणि त्यानंतरचे तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तिच्या व्हिडीओची आणि लूकची सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. आता कतरिना कैफ आणि सलमान खान(Salman Khan)चा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. 

कतरिना कैफ या व्हिडीओत सलमान खानसोबत डान्सचा सराव करताना दिसत आहे. मात्र त्याच दरम्यान तिला राग आला आणि अचानक तिने रागाच्या भरात जे काही केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. कतरिनाचा सराव सलमानला आवडत नाही म्हणून तो निघून जातो. त्यानंतर पुन्हा येतो तेव्हा कतरिना चक्क सलमानचा गळा दाबते असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ टायगर शूटिंग दरम्यानचा असल्याचं दिसत आहे. 


या व्हिडीओवर खूप रिएक्शन देखील येत आहेत. खरेतर हा थ्रो बॅक व्हिडीओ असल्याचे समजते आहे. कतरिनाच्या लग्नानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा समोर आल्यामुळे या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ या दोघांची एक था टायगर चित्रपटातील केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. 'माशाल्लाह' या गाण्यादरम्यानचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओला खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. 

Web Title: Katrina Kaif strangles Salman Khan, the actor left the shoot, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.