ठरलं तर ! 'या' तारखेला होणार कतरिना -विकीच्या वेडिंगचं ग्रॅंड रिसेप्शन, सलमान-रणबीर येणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 04:19 PM2021-12-15T16:19:16+5:302021-12-15T16:24:27+5:30
विकी (Vicky Kaushal) आणि कतरिना (Katrina Kaif ) चे 20 डिसेंबरला मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे.
कतरिना कैफ (Katrina Kaif ) व विकी कौशल (Vicky Kaushal) हे लव्हबर्ड्स गेल्या 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. दोघांनी राजस्थानमधील बरवाडा येथील हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट येथे अगदी शाही थाटामाटात लग्न केलं. राजस्थानमध्ये रॉयल स्टाईल डेस्टिनेशन वेडिंगचे अनेक फोटो विकी व कतरिनाने शेअर केले आहेत. मेहंदीपासून हळद ते शाही पॅलेसमधील रॉयल फोटोशूटपर्यंतच्या त्यांच्या फोटोंची सध्या जाम चर्चा आहे.
आता बातमी आहे की, विकी आणि कतरिनाचे 20 डिसेंबरला मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. 'बॉलीवूड लाईफ'च्या रिपोर्टनुसार, कतरिना आणि तिचे कुटुंब ख्रिसमस धूमधडाक्यात साजरा करतात. त्यामुळे विकी आणि कतरिनाने यावेळी एकत्र ख्रिसमसचं सेलिब्रेशन करणार आहेत. रिपोर्टनुसार, हे कपल ख्रिसमसच्या आधी ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन ठेवणार आहे.
कोरोना विषाणूचा हा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रिसेप्शन पार्टीमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल. तसेच बीएमसीचे सर्व नियम पाळले जातील. आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल.
सलमान, रणबीरला निमंत्रण?
रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी कौशल लग्नाच्या रिसेप्शनसाठी सलमान खानपासून रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानलाही आमंत्रित करू शकतात. या सर्व स्टार्सना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. मात्र याबाबत अजून काही अधिकृत माहिती नाही. रिसेप्शनला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.