रणबीर कपूरसोबतचा प्रायव्हेट फोटो लीक झाल्यावर खूप भडकली होती कतरिना कैफ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 08:00 AM2021-05-18T08:00:00+5:302021-05-18T08:00:00+5:30
एकेकाळी रणबीर आणि कतरिनाच्या प्रायव्हेट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आज भलेही आलिया भटला डेट करतो आहे पण एक वेळ असा होता जेव्हा तो आणि कतरिना कैफ यांच्या अफेयरच्या खूप चर्चा ऐकायला मिळत असे. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकत्र परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रणबीर आणि कतरिनाच्या प्रायव्हेट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
जेव्हा रणबीर कपूर आणि कतरिना कैफ रिलेशनशीपमध्ये होते तेव्हा त्यांचे हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खरेतर ते दोघे व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी इबिजाला गेले होते. तिथले त्यांचे प्रायव्हेट फोटो लीक झाले होते. दोघे समुद्र किनारी दिसले होते. त्यावेळी रणबीर शॉर्ट्समध्ये होता आणि कतरिना कैफ व्हाइट आणि रेड बिकनीत होती.
प्रायव्हेट फोटो लीक झाल्यावर कतरिना कैफने प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, मी तेव्हा अपसेट नव्हते, आताही मी अपसेट नाही. त्यावेळी मी खूप काही शिकले. तो खूप खासगी क्षण होता आणि मला थोडी प्रायव्हेसी हवी होती. त्यावेळी मला राग आला होता पण पुढच्या वेळी मी प्रायव्हेट हॉलिडेच्या वेळी फोटो क्लिक करायचा प्लान असेल तर मला आधी सांगा. म्हणजे मी मॅचिंग कपडे परिधान करून जाईन. मला माहित आहे रेड आणि व्हाइट कलर अजिबात मॅच करत नाही. पुढच्या वेळी मॅचिंग बिकनी परिधान करेन.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या या फोटोंवर मीडियाने सलमान खानची प्रतिक्रिया जाणून घेताना तो खूप संतापला होता. तेव्हा दबंग खान म्हणाला होता की, त्याला कतरिना कैफचा हा फोटो मॉर्फ्ड आहे. तो म्हणाला होता की, कुणी सुट्टीवर गेले आहे आणि अशारितीने त्यांचे फोटो क्लिक करणे चुकीचे आहे. हे तुमच्या आई आणि बहिणीसोबतही होऊ शकते.
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ६ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर आता कतरिना कैफचे नाव विकी कौशलसोबत चर्चेत येत आहे.