रणबीरच्या एक्स-गर्लफ्रेंड्सना टोमणा मारणाऱ्या नीतू कपूर यांना कतरिनाच्या आईनं दिलं उत्तर? चर्चा तर होणारच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 04:31 PM2023-04-11T16:31:45+5:302023-04-11T16:33:59+5:30
Neetu Kapoor : दोन दिवसांपूर्वी नीतूंनी केलेली ही पोस्ट पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. नेटकऱ्यांनी नीतू कपूर यांच्या या पोस्टचा संबंध रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण व कतरिना कैफशी जोडला होता. आता...
Katrina Kaif's mom reply to Ranbir Kapoor's mother Neetu :रणबीर कपूरची आई व ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर (Ranbir Kapor's mom Neetu Kapoor) यांच्या एका पोस्टची बरीच चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी नीतूंनी केलेली ही पोस्ट पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या पोस्टमधून नीतू यांनी रणबीरच्या एक्स गर्लफ्रेन्ड कतरिना कैफ व दीपिका पादुकोण यांना टोला लगावल्याचं मानलं गेलं. “त्याने तुम्हाला सात वर्षे डेट केलं, याचा अर्थ तो तुमच्याशी लग्न करेल असं नाही. माझे काका सहा वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत,” अशा आशयाची इन्स्टा स्टोरी नीतू यांनी शेअर केली होती. त्यांच्या स्टोरीचा हा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी नीतू कपूर यांच्या या पोस्टचा संबंध रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण व कतरिना कैफशी जोडला होता. यावरून अनेकांनी नीतू यांना ट्रोलही केलं होतं. आता नीतू यांनी खरंच रणबीरच्या एक्स गर्लफ्रेन्ड्सला टोमणा मारला की नाही, ते त्यांनाच ठाऊक. पण आता कतरिना कैफच्या आईची (Katrina Kaif's mother Suzanne ) अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. कतरिनाच्या आईची ही पोस्ट म्हणजे नीतू कपूर यांना उत्तर असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
होय, कतरिनाची आई सुझान यांच्या नावाच्या एका अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. हे कतरिनाच्या आईचं अधिकृत अकाऊंट आहे की नाही, याबद्दल दाव्याने सांगता येणार नाही. पण या अकाऊंटवर सुझान यांचा फोटो आहे. नावही त्यांचं आहे. ‘मला अशी शिकवण देण्यात आली की तुम्ही कंपनीच्या सीईओला जितका आदर देता तितकाच आदर सफाई कर्मचार्यांना द्या.’, असं सुझान यांच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. परफेक्ट टायमिंग... असं एका युजरने म्हटलं आहे. काहींच्या मते कतरिनाच्या आईने नीतू कपूर यांना जशास तसं उत्तर दिलं आहे.
रणबीर आणि कतरिना जवळपास सहा ते सात वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टीलाही कतरिनाने हजेरी लावली होती. मात्र अचानक दोघांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपच्या काही वर्षांनंतर कतरिना त्याविषयी बोलली होती. “मी आता ब्रेकअपच्या घटनांना एका प्रकारची शिकवणच समजते. आता मी आयुष्यातील काही गोष्टींकडे अत्यंत वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागले आहे. उलट ब्रेकअपमुळे मी स्वत:वर अधिक लक्ष केंद्रीत करू शकले”, असं ती म्हणाली होती.