कतरिना स्ट्राँगेस्ट वूमन
By Admin | Published: January 28, 2016 02:55 AM2016-01-28T02:55:35+5:302016-01-28T02:55:35+5:30
बिग बॉसच्या फिनालेमध्ये दबंग स्टार सलमान खानने एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ हिला निमंत्रित केले होते. ३२ वर्षीय कतरिनानेही मोकळेपणाने कार्यक्रमाचा आनंद लुटला.
बिग बॉसच्या फिनालेमध्ये दबंग स्टार सलमान खानने एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ हिला निमंत्रित केले होते. ३२ वर्षीय कतरिनानेही मोकळेपणाने कार्यक्रमाचा आनंद लुटला. या वेळी सल्लूने कॅटची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तो म्हणाला, ‘‘मी ओळखत असलेल्या सर्वाधिक शक्तिशााली महिलांपैकी कतरिना एक आहे.’’ ‘बिग बॉस’मध्ये कॅट आणि आदित्य रॉय कपूर यांनी ‘फितूर’ या आपल्या आगामी रोमँटिक चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले. २०१० नंतर ‘बिग बॉस’मध्ये हजेरी लावण्याची कॅटची ही दुसरी वेळ आहे. याआधी २०१० मध्ये ‘तीस मार खाँ’ या कॉमेडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती या शोमध्ये सहभागी झाली होती. एकेकाळचे हे कपल दीर्घकाळानंतर स्टेजवर एकत्र आले तरी त्यांच्या वर्तनात अवघडलेपणा अजिबातही जाणवला नाही. दोघांचाही वावर अतिशय सहज असा होता. या वेळी कॅटला उद्देशून सल्लू म्हणाला, ‘‘तू बॉलीवूडमध्ये आली, तेव्हा अवघी १६ वर्षांची होती. तेव्हापासून इथपर्यंतचा प्रवास सहज झाला नाही. कष्ट करून आणि कठीण परिस्थितीचा साहसीपणाने सामना करून तू हे यश मिळवले आहेस. तुझ्या कष्टाळू वृत्तीचे कौतुक करावे तितके कमीच आहे.’’ कॅटनेही या वेळी सलमानची चांगलीच स्तुती केली.