KBC: भारत-पाकिस्तान करारावर विचारला होता ७ कोटींचा प्रश्न, तुम्हाला येतं का उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 04:16 PM2021-01-08T16:16:48+5:302021-01-08T16:17:48+5:30
१५ प्रश्नांपर्यंत नेहा यांनी असा काही आत्मविश्वास दाखवला की, सगळे बघतच राहिले. त्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली आणि या शोमधून एक कोटी रूपये जिंकून गेल्या.
कौन बनेगा करोडपतीचा १२वा सीझन महिलांनी गाजवला. एकाच सीझनमध्ये चार महिलांनी एक कोटी रूपये आपल्या नावावर केलेत. आपल्या ज्ञानाच्या आणि हिंमतीच्या जोरावर शानदार खेळ करत सर्वांनीच हा शो यावेळी इतका यशस्वी केला. या लिस्टमध्ये तीन महिलांनी आधीच नाव मिळवलं. आता डॉक्टर नेहा शाह यांनी एक कोटी रूपये आपल्या नावावर केलेत.
१५ प्रश्नांपर्यंत नेहा यांनी असा काही आत्मविश्वास दाखवला की, सगळे बघतच राहिले. त्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली आणि या शोमधून एक कोटी रूपये जिंकून गेल्या. पण सस्पेन्स तेव्हा वाढला जेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासमोर ७ कोटी रूपयांचा जॅकपॉट प्रश्न ठेवला. अशात डॉ. नेहा यांच्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.
प्रश्न होता - १९७२ मध्ये इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात झालेली ऐतिहासिक भारत-पाकिस्तान वार्ता शिमलामध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती?
आता मुद्दा चांगलाच मोठा आणि चर्चेत होता. हा करार अनेकदा वादाचंही कारण ठरला आहे. पण ७ कोटींच्या प्रेशरने नेहा यांना हा खेळ क्विट करण्यास भाग पाडलं. त्यांना या प्रश्न बरोबर उत्तर माहीत नव्हतं. तसं या प्रश्नाचं बरोबर उत्तर 'ब्रान्स कोर्ट' हे आहे.
१२व्या सीझनमध्ये सर्वातआधी एक कोटी रूपये जिंकण्याचा मान नाझिया नसीम यांना मिळाला होता. त्यांनी आपल्या खेळाने सर्वांनाच इम्प्रेस केलं होतं. त्यानंतर आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा यांनी एक कोटी रूपये आपल्या नावावर केलेत. सात कोटीच्या प्रश्नावर त्यांनीही खेळ क्वीट केला होता. तेच नेहा शाह यांच्याआधी अनुपा दास यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन एक कोटी रूपये जिंकले होते.