एक कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले का UPSCची तयारी करणारा चंद्र प्रकाश ? बिग बींनी दिल्या शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 09:00 AM2024-09-22T09:00:38+5:302024-09-22T09:01:29+5:30
KBC 16 च्या मंचावर विविध स्पर्धक लक्ष वेधून घेत आहेत
Kaun Banega Crorepati 16 :'कौन बनेगा करोडपती 16' (Kaun Banega Crorepati ) ची सध्या चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या अफलातून शैलीत KBC 16 चं होस्टिंग करत आहेत. KBC 16 च्या मंचावर विविध स्पर्धक लक्ष वेधून घेत आहेत. KBC 16 च्या मंचावर जम्मू-काश्मीरमधील UPSC ची तयारी करणारा 22 वर्षीय चंद्र प्रकाश सहभागी झाला, जो लहानपणापासूनच आरोग्याच्या आव्हानांना तोंड देत आला आहे. चंद्र प्रकाशला १ कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला आहे. तो या प्रश्नाचं उत्तर देत करोडपती होणार का? याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
संयम आणि दृढनिश्चयाने खेळत चंद्र प्रकाश हा 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहचला आहे. त्याच्या प्रयत्नाचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलं. चंद्र प्रकाशच्या संघर्षांबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील दिवंगत हरिवंशराय बच्चन यांना सांगितलेला एक मनोरंजक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'माझे बाबूजी म्हणायचे बेटा, जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत संघर्ष आहे'.
25 सप्टेंबर रोजी तो 1 कोटी प्रश्नाचे उत्तर देताना दिसून येईल. चंदर प्रकाशला येणार का १ कोटींसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येणार का ? हे 25 सप्टेंबर रोजीच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल. 'कौन बनेगा करोडपती 16' प्रत्येक भाग प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी टेलिव्हिजनवर पाहू शकता.