KBC 13: कारगिल युद्धासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला खेळ, तुम्हाला माहीत आहे का बरोबर उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 12:25 PM2021-09-29T12:25:16+5:302021-09-29T12:26:17+5:30
Kaun Banega Crorepati 13: कश्मीर पूंचचे राहणारे सरबजीत यांनी ११ प्रश्नांची बरोबर उत्तरं दे सहा लाख ४० हजार रूपये जिंकले. पण १२ व्या प्रश्नाचं ते बरोबर उत्तर देऊ न शकल्याने त्यांनी शो क्विट करण्याच निर्णय घेतला.
Kaun Banega Crorepati 13: 'कौन बनेगा करोडपती' चा नवा सीझन लोकांना मालामाल करण्यासाठी पुन्हा एकदा आला आहे. पुन्हा एकदा या शोने लोकांच्या मनावर गारूड केलं आहे. त्यात अमिताभ बच्चन यांची उपस्थिती यामुळे या शोची रंगत आणखीन वाढते. ते यात यात स्पर्धकांना केवळ प्रश्न विचारत नाही तर त्यांच्या पर्सनल लाइफबाबत बोलतात. मंगळवारचा एपिसोडही शानदार झाला. शोची सुरूवात रोलओवर स्पर्धक सरबजीत सिंह यांच्यासोबत झाली. कश्मीर पूंचचे राहणारे सरबजीत यांनी ११ प्रश्नांची बरोबर उत्तरं दे सहा लाख ४० हजार रूपये जिंकले. पण १२ व्या प्रश्नाचं ते बरोबर उत्तर देऊ न शकल्याने त्यांनी शो क्विट करण्याच निर्णय घेतला. चला जाणून घेऊ काय होता १२ वा प्रश्न..
प्रश्न - कारगिल युद्धा दरम्यान जेट विमानाच्या अमूल्य योगदानामुळे भारतीय वायु सेनेच्या पायलटांनी मिग-२७ विमानाला काय टोपण नाव देण्यात आलं होतं?
याचे पर्याय होते
A - शेरा
B - बहादुर
C - निर्भीक
D - जांबाज
उत्तर - या प्रश्नाचं बरोबर उत्तर 'बहादुर' आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहीत नसल्याने सरबजीत यांनी सहा लाख ४० हजार रूपयांवर खेल क्विट करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सरबजीत सिंह व्यवसायाने एक शिक्षक आहेत. ते काश्मीरमद्ये पोस्टेड आहेत. केबीसीमध्ये सरबजीत आपले वडील आणि पत्नीसोबत आले होते. शो दरम्यान त्यांनी सांगितलं की, ज्या शाळेत ते शिकवतात ती शाळा एलओसीच्या जवळ आहे. कधी कधी मुलांना शिकवत असताना एलओसीवर फायरिंगा आवाजही येतो. इतकंच नाही तर कधी कधी त्यांच्या शाळेलाही बंकर बनवलं जातं. ज्यामुळे शाळा १० ते १५ दिवस बंद राहते.