हिंदू धर्मग्रंथाविषयीच्या २५ लाखांच्या कठीण प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 04:57 PM2024-10-24T16:57:27+5:302024-10-24T16:58:00+5:30

KBC 17 साठी हर्षा उपाध्याय यांना २५ लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही

kbc 17 show harsha upadhyay quit game of 25 lakh question with amitabh bachchan | हिंदू धर्मग्रंथाविषयीच्या २५ लाखांच्या कठीण प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर

हिंदू धर्मग्रंथाविषयीच्या २५ लाखांच्या कठीण प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर

सध्या 'कौन बनेगा करोडपती' अर्थात KBC 17 ची चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या खास शैलीत KBC 17 चं सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचा KBC 17 चं पर्व अनेक कठीण प्रश्नांनी भरलेलं आहे. काही स्पर्धक हुशारी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर KBC 17 मध्ये बाजी मारतात. तर काही स्पर्धक कठीण प्रश्नावर रिस्क न घेता खेळ सोडतात. KBC 17 मध्ये हिंदू धर्मग्रंथाविषयीच्या अशाच एका प्रश्नावर स्पर्धकाने खेळ सोडलाय. काय होता तो प्रश्न?

KBC 17 चा २५ लाखांचा प्रश्न

KBC 17 मध्ये हर्षा उपाध्याय या दिव्यांग महिला सहभागी झाल्या होत्या. हुशारीच्या जोरावर हर्षा यांनी खूप रक्कम जिंकली. परंतु २५ लाखांचा प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही. काय होता हा २५ लाखांचा प्रश्न. पुढीलप्रमाणे हिंदू ग्रंथों के अनुसार इनमें से क्या पृथ्वी के सात द्वीपों में से एक नहीं है? A. पुष्कर द्वीप B. कुश द्वीप C. क्रौंच द्वीप
D. इक्षुरस द्वीप. हे चार ऑप्शन होते. परंतु हर्षा यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. 


काय होतं या प्रश्नाचं उत्तर

हर्षा यांनी या प्रश्नासाठी सुरुवातीला व्हिडीओ कॉल ही लाईफलाईन वापरली. परंतु ही लाईफलाईन त्यांना उपयोगी झाली नाही. पुढे हर्षा यांनी डबल डीप लाईफलाईनचा वापर केला. परंतु उत्तर माहित नसल्याने समजुतदारपणाचा वापर करत त्यांनी गेम क्विट केला. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन D. इक्षुरस द्वीप. सध्या KBC 17 ची चांगलीच उत्सुकता असून बिग बी त्यांच्या खास शैलीत KBC 17 चं खुमासदार सूत्रसंचालन करत आहेत.

Web Title: kbc 17 show harsha upadhyay quit game of 25 lakh question with amitabh bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.