दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशचा होणार बॉलिवूड डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 09:00 PM2019-03-03T21:00:00+5:302019-03-03T21:00:03+5:30
दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश सध्या तेलगू आणि तामिळ चित्रपटात बिझी आहे. पण हीच किर्ती आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.
ठळक मुद्देकिर्ती ही साऊथचे निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. सन २००० मध्ये बालकलाकार म्हणून तिने अभिनय सृष्टीत पाऊल ठेवले.
दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश सध्या तेलगू आणि तामिळ चित्रपटात बिझी आहे. पण हीच किर्ती आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. होय. ताजी बातमी खरी मानाल तर किर्तीने एक बॉलिवूड चित्रपट साईन केलाय. बोनी कपूर हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. ‘बधाई हो’चे दिग्दर्शक अमित शहा हा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याची खबर आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. पण लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा होईल, अशी शक्यता आहे.
रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटात किर्तीची वर्णी लागल्याची खबर मध्यंतरी होती. ए आर मुरूगदास दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत दोन अभिनेत्रींसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या सिनेमासाठी साऊथ स्टार नयनतारा व किर्ती सुरेश हिला कास्ट करण्यात आल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप घोषणा होणे बाकी आहे.
किर्ती ही साऊथचे निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे. सन २००० मध्ये बालकलाकार म्हणून तिने अभिनय सृष्टीत पाऊल ठेवले. २०१३ मध्ये ‘गीतांजली’ या मल्याळम चित्रपटातून तिने लीड अभिनेत्री म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु केली. २०१४ मध्ये तिने अनेक तामिळ चित्रपटांच्या आॅफर स्वीकारल्या.किर्ती अलीकडे ‘सरकार’ या साऊथच्या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय लीड रोलमध्ये होता.