अक्षय कुमारच्या 'केसरी २'ने ६ दिवसांत किती कमावले? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:40 IST2025-04-24T15:39:26+5:302025-04-24T15:40:06+5:30
१८ एप्रिलला अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असलेला 'केसरी २' हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. आता या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

अक्षय कुमारच्या 'केसरी २'ने ६ दिवसांत किती कमावले? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
अक्षय कुमारचा 'केसरी २' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू होती 'केसरी २'च्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. १८ एप्रिलला अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असलेला 'केसरी २' हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. आता या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'केसरी-२' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ७.८४ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी १०.०८ कोटींचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने ११.८४ कोटी इतकी कमाई केली. त्यामुळे वीकेंडपर्यंत सिनेमाने २९.७० कोटी कमावले होते. सोमवारपासून सिनेमाच्या कमाईत घट दिसून आली. सोमवारी 'केसरी-२'ने ४.५ कोटी, मंगळवारी ५ कोटी तर बुधवारी ३.६ कोटी कमावले आहेत. आत्तापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४२.६ कोटींचा गल्ला जमवला आहे.
अक्षय कुमारचा 'केसरी-२' सिनेमा १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध न्यायालयात लढा देणारे बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात अक्षयने नायर यांची भूमिका केली आहे, तर आर माधवन ब्रिटीश वकिलाच्या आणि अनन्या पांडेने दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. 'केसरी-२' चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केलं आहे. तर धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे.