Kesari Box Office Collection : केसरीची घौडदोड सुरूच... आतापर्यंत कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 02:35 PM2019-04-01T14:35:55+5:302019-04-01T14:40:12+5:30
फिल्म अॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी केसरीच्या या घौडदोडीविषयी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी लिहिले आहे की, केसरी या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अक्षय कुमार आणि परिणिती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरू आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारच्याकेसरीला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली असून यंदाच्या ‘बिगेस्ट ओपनर’ सिनेमांच्या लिस्टमध्ये ‘केसरी’ने पहिले स्थान मिळवले आहे.
‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्याच दिवशी केसरीने २१. ५० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १६.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १८.७५ कोटींचा गल्ला जमावलाय. पहिल्या पाच दिवसांत केसरीने ऐकूण ७८.०७ कोटींची कमाई केली होती आणि आता तर या चित्रपटाने १२५ कोटीहून अधिक गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे.
फिल्म अॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी केसरीच्या या घौडदोडीविषयी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी लिहिले आहे की, केसरी या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरचे कलेक्शन यापुढे देखील असेच राहिले तर हा चित्रपट अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाचा रेकॉर्ड नक्कीच मोडेल. केसरी या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी ४.४५ कोटी, शनिवारी ६.४५ कोटी, रविवारी ८.२५ कोटी इतकी कमाई करत १२५.०१ इतका गल्ला आजवर जमवला आहे. केसरीचे कलेक्शन पाहाता हा चित्रपट लवकरच १५० कोटीचा टप्पा पार पाडेल.
#Kesari biz at a glance...
— taran adarsh (@taran_adarsh) April 1, 2019
Week 1: ₹ 105.86 cr [8 days]
Weekend 2: ₹ 19.15 cr
Total: ₹ 125.01 cr
Biz has stabilised outside North India [which is doing excellent biz from Day 1]... Should touch/cross ₹ 150 cr, in view of the current trending. India biz.
केसरीला पहिल्या दिवसांपासून समीक्षकांची आणि प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि आता तर माऊथ पब्लिसिटी या जोरावर ‘केसरी’कडून बक्कळ कमाईची अपेक्षा केली जात आहे. ‘केसरी’ची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली आहे तर अनुराग सिंहने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अक्षयने यात हवालदार इशार सिंगची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा सोबतच मीर सरवर मुख्य भूमिकेत आहे.