KGF 2 twitter Review : रॉकी भाईचा KGF 2 प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला की नाही? वाचा काय म्हणाले प्रेक्षक...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 01:27 PM2022-04-14T13:27:11+5:302022-04-14T13:27:57+5:30

KGF 2 Twitter Reaction : रॉकी भाईचा हा केजीएप २ प्रेक्षकांना कसा वाटला याच्या काही प्रतिक्रिया ट्विटवर बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा खूपच आवडलेला दिसतो. काही तर म्हणाले की, हा सिनेमा पहिल्या भागापेक्षाही भारी आहे.

KGF 2 twitter Review : Fans says Yash and Sanjay Dutt starrer film is blockbuster | KGF 2 twitter Review : रॉकी भाईचा KGF 2 प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला की नाही? वाचा काय म्हणाले प्रेक्षक...

KGF 2 twitter Review : रॉकी भाईचा KGF 2 प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला की नाही? वाचा काय म्हणाले प्रेक्षक...

googlenewsNext

KGF 2 Twitter Reaction : साऊथचा सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असलेला KGF 2 अखेर रिलीज झाला. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते कारण केजीएफच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना भारावून सोडलं होतं. आता या सिनेमात संजय दत्त, रवीना टंडन यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. रॉकी भाईचा हा केजीएप २ प्रेक्षकांना कसा वाटला याच्या काही प्रतिक्रिया ट्विटवर बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा खूपच आवडलेला दिसतो. काही तर म्हणाले की, हा सिनेमा पहिल्या भागापेक्षाही भारी आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनुसार केजीएफ २ त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. काही म्हणाले हा सिनेमा ब्लॉकबस्टर आहे. तसेच लोक यातील रॉकी भाईच्या भूमिकेवरही फिदा झाले आहेत. चला जाणून घेऊन काय काय म्हणाले प्रेक्षक.

दरम्यान केजीएफ हा सिनेमा २०१८ मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी या सिनेमाने कमालीची लोकप्रियता मिळवली होती. यातील रॉकी भाईची भूमिका लोकांनी उचलून धरली होती. बॉक्स ऑफिसवर या  सिनेमाने मोठी कमाई केली होती. आता या सिनेमासोबत साऊथ आणखी मोठा सिनेमा म्हणजे थलापति विजय Beast हाही रिलीज झाला आहे. त्यामुळे आता कोणता सिनेमा ट्रेंड सेट करणार हे बघावं लागेल.

Web Title: KGF 2 twitter Review : Fans says Yash and Sanjay Dutt starrer film is blockbuster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.