KGF 2 Box Office Collection: रॉकी भाईचा जगभरात धुमाकूळ, कमाईचा आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 01:29 PM2022-05-27T13:29:01+5:302022-05-27T13:30:58+5:30

दिग्दर्शक प्रशांत नील (Prashanth Neel) यांचा ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला आहे.

Kgf chapter 2 box office collection yash and sanjay dutt starrer film collects 1230 crore rupees | KGF 2 Box Office Collection: रॉकी भाईचा जगभरात धुमाकूळ, कमाईचा आकडा वाचून व्हाल थक्क

KGF 2 Box Office Collection: रॉकी भाईचा जगभरात धुमाकूळ, कमाईचा आकडा वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

दिग्दर्शक प्रशांत नील (Prashanth Neel) यांचा ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार यशच्या या चित्रपटाला रिलीज होऊन ४३ दिवस झाले. पण त्याच्या कलेक्शनचा वेग थांबत नाहीये. देशातच नाही तर परदेशातही रॉकी भाईचा डंका आहे. आता 'KGF 2'च्या नव्या कलेक्शनची माहिती समोर आली आहे. KGF 2 हिंदी सिनेमात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे.

ट्रेंड एनालिस्ट विजयबालन यांनी सांगितले की यशच्या चित्रपट 'KGF Chapter 2' ची कमाई सहाव्या आठवड्यातही सुरूच आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 1230.37 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मनोबाला यांनी सांगितले की, 'KGF 2' ने पाच आठवड्यात 1210 कोटी रुपये कमावले आहेत.

पहिल्या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत - 1210.53 कोटी
6 वा आठवडा
दिवस 1 - 3.10 कोटी
दिवस 2 - 3.48 कोटी
दिवस 3 - 4.02 कोटी
चौथा दिवस - ४.६८ कोटी
दिवस 5 - 1.87 कोटी
दिवस 6 - 1.46 कोटी
दिवस 7 - 1.23 कोटी
एकूण कलेक्शन - 1230.37 कोटी

यशचा चित्रपट 'KGF Chapter 2' Amazon Prime Video वर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे प्रशांत नील यांनी 'KGF Chapter 2' ची कथा लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रकाश राज सारख्या स्टार्सनी काम केले आहे, ज्यांच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. आता निर्माते या सिनेमाच्या तिसऱ्या भागावर लवकरच काम सुरू करणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Kgf chapter 2 box office collection yash and sanjay dutt starrer film collects 1230 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.