‘केजीएफ’फेम सुपरस्टार यश दुस-यांदा झाला बाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 01:47 PM2019-10-30T13:47:12+5:302019-10-30T13:53:38+5:30
यशची पत्नी राधिका पंडित हिने आज सकाळी बेंगळुरूच्या रूग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला.
‘केजीएफ’ सारखा सुपरडुपर हिट सिनेमा देणारा साऊथ सुपरस्टार यश दुस-यांदा बाबा झाला. यशची पत्नी राधिका पंडित हिने आज सकाळी बेंगळुरूच्या रूग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. हे यश व राधिकाचे दुसरे अपत्य आहे.
या दांम्पत्याला आयरा नावाची एक मुलगी आहे. 2 डिसेंबर 2018 रोजी आयराचा जन्म झाला होता.आयराच्या नामकरणाच्या दिवशीच यशने पत्नीच्या दुस-या प्रेग्नंसीचा खुलासा केला होता.
यश कन्नड सिनेसृष्टीचा दिग्गज स्टार आहे. यशने दिवाळीवर आर्यासोबतचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला होता. ‘ही आमची पहिली दिवाळी. यापेक्षा स्पेशल दुसरे काय असू शकते?’, असे यशने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते.
राधिका पंडित आणि यश हे दोघेही दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील गाजलेले सेलिब्रिटी आहेत. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये असणा-या या दोघांनी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती.
यशचा ‘केजीएफ-चॅप्टर 1’ हा कन्नड भाषेतील पीरियड ड्रामा लोकांना भावला होता. या चित्रपटात एका अनाथ मुलाची कथा दाखवली गेली होती. हा चित्रपट तुफान गाजला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूड स्टार संजय दत्त या चित्रपटात निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. एप्रिल 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.