Fact Check: अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी KGF फेम यशने दान केले 50 कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:59 AM2022-08-31T11:59:00+5:302022-08-31T12:00:35+5:30

Yash: मंदिराच्या उभारणीसाठी खास ५० कोटी रुपयांची देणगी देण्यासाठी तो गेल्याचं म्हटलं जात आहे.

kgf star yash donate 50 crore rupees for ram mandir construction in ayodhya here is the truth fact check | Fact Check: अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी KGF फेम यशने दान केले 50 कोटी?

Fact Check: अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीसाठी KGF फेम यशने दान केले 50 कोटी?

googlenewsNext

दाक्षिणात्य सुपरस्टार यश (yash) त्याच्या दमदार अभिनयासाठी कायमच चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो आयोध्येतील राम मंदिरामुळे चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर यशचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अयोध्येमध्ये दिसत असून या मंदिराच्या उभारणीसाठी त्याने ५० कोटी रुपयांची देणगी दिल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत येत आहे. मात्र, व्हायरल होत असलेल्या या फोटोमागील सत्य काही औरच आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये यश राम मंदिरात दर्शनासाठी गेल्याचं दिसून येत आहे. यावेळी त्याने खांद्यावर सोवळ्याचं उपरणंदेखील घेतलं आहे. तसंच त्याच्यासोबत मंदिरातील काही विश्वस्त आणि त्याची टीम दिसून येत आहे. इतकंच नाही तर या मंदिराच्या उभारणीसाठी खास ५० कोटी रुपयांची देणगी देण्यासाठी तो गेल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, यश कोणत्याही प्रकारची देणगी देण्यासाठी गेला नव्हता हे समोर आलं आहे.

यशचा व्हायरल होत असलेला हा फोटो  एप्रिल २०२२ चा असून हे राममंदिर नसून तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. KGF Chapter 2 च्या प्रदर्शनापूर्वी यशने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. त्यामुळे या फोटोचा आणि राम मंदिराच्या देणगीचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, यश कन्नड कलाविश्वातील दिग्गज अभिनेता असून त्याने २००० मध्ये त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अनेक मालिकांमध्ये झळकलेल्या यशला 2007 मध्ये Jambada Hudugi या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. तेव्हापासून तो चाहत्यांच्या चर्चेत आला. मात्र,२०१८मध्ये आलेल्या KGF मुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला.


 

Web Title: kgf star yash donate 50 crore rupees for ram mandir construction in ayodhya here is the truth fact check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.