'कागदपत्रं असूनही ट्रॅफिक पोलिसांनी नाचवलं..'; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला थक्क करणारा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:29 PM2024-08-26T13:29:46+5:302024-08-26T13:32:47+5:30
बॉलिवूड अभिनेता आणि सुप्रसिद्ध डान्सर असलेल्या अभिनेत्याने सर्व कागदपत्रं असूनही त्याला ट्रॅफिक पोलिसांनी का अडवलं? याचा खुलासा केलाय.
सध्या अनेक बॉलिवूड सिनेमे गाजवत असलेला लोकप्रिय अभिनेता आणि डान्सर म्हणजे राघव जुयाल. राघव सध्या 'किल', 'ग्यारह ग्यारह' अशा सुपरहिट कलाकृतींमधून अभिनय करतोय. राघवची स्लो मोशन ही डान्स स्टेप त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. राघवने 'डान्स इंडिया डान्स'मधून भन्नाट डान्स स्टेप करत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. डान्सर असलेला राघव आता अभिनयक्षेत्रातही स्वतःची ओळख बनवतोय. राघवने एका मुलाखतीत भन्नाट किस्सा सांगितलाय. जो वाचून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
सर्व कागदपत्रं असूनही पोलिसांनी राघवला का नाचवलं?
राघव जुयालची 'ग्यारह ग्यारह' ही वेबसीरिज रिलीज झालीय. या वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान मुलाखतीत राघव म्हणाला, "हा किस्सा तसा जुना आहे. मी एका डान्स शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यादरम्यान ट्रॅफिक पोलिसांनी मला एका चौकात अडवलं. त्यांनी मला कॉकरोच या नावाने ओळखलं. त्यांनी मला गाडीतून बाहेर यायला सांगितलं. माझ्याकडे सर्व कागदपत्रं असूनही पोलिसांनी मला का अडवलं, हा मला मोठा प्रश्न होता. त्या पोलिसांना मला स्लो मोशन स्टेप करताना पाहायचं होतं. त्यावेळी रस्त्यावर खूप गर्दी होती. गाड्यांची रांग लागली होती. तरीही मी त्यांच्या आग्रहाखातर भररस्त्यात स्लो मोशन स्टेप केली. पुढे त्यांनी मला जाऊ दिलं."
#Kill movie performed better in the South than in the North. Bollywood audiences seem more interested in creating hashtags on Twitter than actually watching the movie in theaters - #RaghavJuyalpic.twitter.com/CHuztJUmMw
— Matters Of Movies (@MattersOfMovies) August 25, 2024
राघव जुयालचं वर्कफ्रंट
राघव जुयाल हा सुप्रसिद्ध डान्सर आणि अभिनेता आहे. राघवने 'डान्स इंडिया डान्स'मध्ये केलेली स्लो मोशन स्टेप प्रचंड गाजली. राघवला सगळे प्रेमाने 'कॉकरोच' या नावाने ओळखतात. राघवने सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. राघवची खलनायकी भूमिका असलेला 'किल' सिनेमाही प्रचंड गाजला. सध्या राघवच्या 'ग्यारह ग्यारह' वेबसीरिजची चर्चा आहे.