Killer Soup घालणार OTT वर धिंगाणा; मनोज बाजपेयीच्या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 05:39 PM2024-01-04T17:39:58+5:302024-01-04T17:40:53+5:30

Killer Soup: या सीरिजच्या निमित्ताने कोंकणा सेन शर्मा आणि मनोज बाजपेयी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

killer-soup-trailer-manoj-bajpayee-konkona-sensharma-cooking-an-delicious-dark-suspense-thriller | Killer Soup घालणार OTT वर धिंगाणा; मनोज बाजपेयीच्या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज

Killer Soup घालणार OTT वर धिंगाणा; मनोज बाजपेयीच्या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज

  सध्या सगळीकडे वेबसीरिजची चलती आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा कल पाहता ओटीटीवर सुद्धा अनेक नवनवीन धाटणीच्या सीरिजची निर्मिती होत आहे. यामध्येच मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन यांची मुख्य भूमिका असलेल्या Killer Soup या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
 

Killer Soup  ही सीरिज येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून या सीरिजच्या निमित्ताने कोंकणा सेन शर्मा आणि मनोज बाजपेयी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे या सीरिजचा दमदार ट्रेलर रिलीज झाला असून नेटकऱ्यांमध्ये आता ही सीरिज पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये?

किलर सूप या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी तीन वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे.  तर कोंकणा सेन शर्माने एका शेफची भूमिका साकारली आहे. तसंच या सीरिजमध्ये कोंकणा मनोजच्या पत्नीची भूमिका साकारत असल्याचंही या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरुन ही सीरिज एक मर्डर मिस्ट्री असल्याचं दिसून येत आहे. तसंच ४१ कोटींच्या हेराफेरीचाही उल्लेख यात करण्यात आला आहे. इतकंच नाही तर कधी गंभीर, तर कधी विनोदनिर्मिती घडवत ही सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असल्याचंही या ट्रेलरमधून दिसून येत आहे.

दरम्यान, या सीरिजमध्ये अभिनेता सयाजी शिंदेदेखील झळकले आहेत. ते एक गँगस्टरची भूमिका साकारत आहेत. या सीरिजचं दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केलं आहे. या सीरिजपूर्वी त्यांनी इश्कियाँ, उडता पंजाब, सोनचिडिया यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

Web Title: killer-soup-trailer-manoj-bajpayee-konkona-sensharma-cooking-an-delicious-dark-suspense-thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.