अखेर किरण रावला मिळाली मनासारखी स्क्रिप्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 09:25 PM2018-09-02T21:25:25+5:302018-09-02T21:27:33+5:30

आमिर खान त्याच्या एकीकडे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या रिलीजच्या तयारीत व्यस्त आहे तर त्याची पत्नी किरण राव हिनेही आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.

Kiran Rao to break seven-year hiatus with new directorial attempt | अखेर किरण रावला मिळाली मनासारखी स्क्रिप्ट!

अखेर किरण रावला मिळाली मनासारखी स्क्रिप्ट!

googlenewsNext

आमिर खान त्याच्या एकीकडे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या रिलीजच्या तयारीत व्यस्त आहे तर त्याची पत्नी किरण राव हिनेही आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. होय, किरण राव पुन्हा एकदा दिग्दर्शनक्षेत्रात परततेय. किरण दिग्दर्शित ‘धोबी घाट’ आपण सगळ्यांनीच पाहिला. २०११ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला अपेक्षेनुसार यश मिळू शकले नाही आणि यानंतर किरण निर्मितीच्या कामात गढून गेली. पण आता किरणने आपल्या नव्या प्रोजेक्टची तयारी सुरू केली आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तनुसार, किरणला एक मनासारखी स्क्रिप्ट मिळालीय आणि किरण हा चित्रपट दिग्दर्शित करतेय. खुद्द किरणेचं याबद्दलचा खुलासा केला. मी दीर्घकाळापासून दिग्दर्शन केलेले नाही. माझा मुलगा लहान आहे, वगैरे कारणे मी देत राहिले. पण आता वेळ आली आहे. आता मला दिग्दर्शन करायचे आहे. गेल्या सात वर्षांत मी आठ कथांवर काम केले. पण अंतिमत: यापैकी एकही कथा माझ्या मनाला भावली नाही. पण आता एक स्क्रिप्ट आवडलीय आणि मी ती पूर्ण करण्यात गुंतलीयं. लवकरच या चित्रपटाचे काम सुरू होईल, असे किरणने सांगितले.
किरण रावने दिग्दर्शित केलेला ‘धोबी घाट’ कमर्शिअल चित्रपट नव्हता तर एक आर्ट पीस होता. अशा चित्रपटाचे बॉक्सआॅफिसवर काय होते, हे आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहेच. आता किरण राव नवा प्रोजेक्ट घेऊन येतेय. तिचा हा चित्रपट कसा असेल, याबद्दल म्हणूनच उत्सुकता असेल.
किरणने ‘लगान’, ‘स्वदेश’, ‘मान्सून वेडिंग’ अशा चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ‘लगान’च्या सेटवरचं आमिर व किरणची भेट झाली होती. यानंतर त्यांच्या प्रेम बहरले होते.

Web Title: Kiran Rao to break seven-year hiatus with new directorial attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.