'वर्षभर लिव्ह-इन राहिलो, लग्नाचा विचार नव्हता, पण...', किरण राव यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या - 'दबावात लग्न केलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:53 AM2024-05-23T10:53:25+5:302024-05-23T10:54:06+5:30

किरण रावने २००५ मध्ये आमिर खानशी लग्न केले. पण नंतर २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Kiran Rao's big revelation She Claims Married Aamir Khan Only Due To Their Parents | 'वर्षभर लिव्ह-इन राहिलो, लग्नाचा विचार नव्हता, पण...', किरण राव यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या - 'दबावात लग्न केलं'

'वर्षभर लिव्ह-इन राहिलो, लग्नाचा विचार नव्हता, पण...', किरण राव यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या - 'दबावात लग्न केलं'

'लापता लेडीज' या चित्रपटाची अजुनही सगळीकडेच चर्चा होताना दिसते. किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर चांगलीच कमाई केली.  या सिनेमामुळे किरण राव सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.  यात तिच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्याचीही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर किरण यांची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये आमिरसोबत घरच्यांचा दबावामुळे लग्न केल्याचा खुलासा किरण राव यांनी केला आहे. 

नुकतेच  किरण राव यांनी 'शी द पीपल' या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये किरण राव यांनी आमिरसोबत लग्नाआधी एक वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याचं सांगितलं. तसेच आई-वडिलांच्या दबावामुळे लग्न करावे लागल्याचा खुलासा त्यांनी केला. त्या म्हणाल्या, 'लग्नाआधी आम्ही दोघे एक वर्ष एकत्र राहिलो. आम्हाला दोघांनाही जास्त काळ एकत्र राहायचं होतं, पण आमच्या पालकांची आम्ही लग्न करून एकत्र राहावं अशी इच्छा होती. त्यामुळे आम्हाला लग्न करावं लागलं'. 

घटस्फोटाची भीती वाटते का, या प्रश्नावर किरण राव म्हणाल्या, 'याबद्दल विचार करण्यासाठी खूप वेळ घेतला होता. त्यामुळे कोणतीही भीती नव्हती. मी आणि आमिर अजूनही एकमेकांशी जोडलेले आहेत आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. घटस्फोटानंतर ही गोष्ट बदललेली नाही. त्यामुळे मला चिंता नव्हती. मला स्वतंत्रपणे जगायचे होतं आणि स्वतःचा विकास करायचा होता. आमिरनेही ते स्वीकारले'.

किरण राव आणि आमिर खान यांचं लग्न २००५ मध्ये झालं होतं. पण नंतर २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचे नाव आझाद खान आहे. आमिर खानने दोन लग्न केली आहेत आणि दोन्ही पत्नींना घटस्फोट दिलाय. त्यांचे पहिले लग्न 1986 मध्ये रीना दत्तासोबत झाले होतं. 2002 मध्ये अवघ्या 16 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.  आमिरला पहिल्या पत्नीपासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे.

Web Title: Kiran Rao's big revelation She Claims Married Aamir Khan Only Due To Their Parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.