चर्चा तर होणारच, बिग बॉसमध्ये शमिता शेट्टीसोबत रोमान्स करणाऱ्या राकेश बापटने केले होते 'या' अभिनेत्रीसह लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 11:50 AM2021-08-30T11:50:49+5:302021-08-30T11:56:44+5:30

नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये राकेश बापट शमिता शेट्टीला चक्क किस करताना दिसत आहे. तर कधी तिचे पाय चेपताना दिसत आहे. दोघेही एकमेकांसह प्रत्येक गोष्ट शेअर करताना दिसतात.

Kiss me now ! Shamita Shetty's shocking dialogue to Rakesh Bapat, was husband of actress Ridhi Dogra | चर्चा तर होणारच, बिग बॉसमध्ये शमिता शेट्टीसोबत रोमान्स करणाऱ्या राकेश बापटने केले होते 'या' अभिनेत्रीसह लग्न

चर्चा तर होणारच, बिग बॉसमध्ये शमिता शेट्टीसोबत रोमान्स करणाऱ्या राकेश बापटने केले होते 'या' अभिनेत्रीसह लग्न

googlenewsNext

सोशल मीडियावर सध्या राकेश बापट आणि शमिता शेट्टी चर्चेचा विषय बनले आहेत. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून दोघेही प्रचंड चर्चेत आले आहेत. आता तर दोघांमध्ये वेगळेच नाते पाहायला मिळत आहे. दोघांमध्येही दिवसेंदिवस जवळीक वाढत आहे. आता त्यांच्या रोमँटीक केमिस्ट्रीमुळे त्यांच्यावर चर्चा होत आहे. राकेश बापट सतत शमिताच्या अवती भोवती फिरत असतो.नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये राकेश बापट शमिता शेट्टीला चक्क किस करताना दिसत आहे.

तर कधी तिचे पाय चेपताना दिसत आहे. दोघेही एकमेकांसह प्रत्येक गोष्ट शेअर करताना दिसतात. अगदी खासगी गोष्टींवर देखील दोघे चर्चा करत असतात. या दोघांमुळे नेहमीप्रमाणे यंदाही प्रेमाचे बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहणार असंच दिसतंय. दोघेही शोमध्ये सध्या एकमेकांचा आधार बनत खेळी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

राकेश बापटच्या खासगी आयुष्यावर बोलायचे झाले तर त्याचे लग्न टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोंगरासोबत झाले होते. दोघांची ओळख २०१० ‘'मर्यादा मालिकेच्या सेटवर झाली होती.तिथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले त्यांनाही कळाले नाही. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानतर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता .

२०११मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्रीही होती. पण लग्नाच्या ८ वर्षातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१९ साली दोघांनी घटस्पोट घेत वेगळे झाले होते. या घटस्फोटामुळे राकेश कोलमडून गेला होता. त्याला प्रचंड मोठा धक्काच बसला होता. त्याच्या या घटस्फोटाविषयी तो शमितासोबत बोलताना दिसला होता. त्यावेळी त्याचे दुःख ऐकून शमितानेही त्याला मिठी मारली होती. 

राकेश बापटचे फिल्मी करिअर पाहिजे तसे यशश्वी ठरले नाही. ‘तुम बिन’,’दिल विल प्यार व्यार’, ‘नाम गुम जाएगा’, ‘गिप्पी’ या हिंदी सिनेमांसोबतच ‘वृंदावन’, ‘सविता दामोदर परांजपे’ मराठी सिनेमातही तो झळकला आहे.

आता बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून पुन्हा को प्रकाशझोतात आला आहे. आता आगामी काळात शोमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी दोघांमध्ये केमिस्ट्री कशी फुलत जाते हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Kiss me now ! Shamita Shetty's shocking dialogue to Rakesh Bapat, was husband of actress Ridhi Dogra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.