जवानसाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 03:11 PM2023-09-02T15:11:48+5:302023-09-02T15:21:34+5:30

जवानमध्ये काम करण्यासाठी तिने 25 ते 30 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं कळतंय.

Know how much money Deepika received for her first film, who took crores for Jawan movie | जवानसाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या

जवानसाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या

googlenewsNext

बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. सध्या सगळीकडे फक्त ‘जवान’ची चर्चा पाहायला मिळत आहे. ‘जवान’चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आलं. यादरम्यान ३०० कोटी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमात काम करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोणने घेतलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे. 

दीपिका पादुकोण आज बॉलिवूडच्या लीडिंग लेडीच्या यादीत अव्वल स्थानी आहे. दीपिका आज बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. मीडिया रिपोर्टनुसार  जवानमध्ये काम करण्यासाठी तिने 25 ते 30 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं कळतंय. पण तुम्हाला माहिती आहे का आजची हायस्ट पेड अभिनेत्री असलेल्या दीपिका पहिला सिनेमा ओम शांती ओमसाठी किती पैसे मिळाले होते.  

गेल्या 14 वर्षात तिने तिच्या चाहत्यांना अनेक अप्रतिम चित्रपट दिले आणि हेच कारण आहे की आज ती प्रत्येक चित्रपटासाठी अनेक कोटी रुपये घेते, परंतु ओम शांती ओम या पहिल्या चित्रपटासाठी तिने किती पैसे घेतले होते हे तुम्हाला माहिती आहे का? हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला होता आणि त्यात दीपिकाच्या सोबत शाहरुख खान होता, त्यामुळे दीपिका पादुकोणसाठी ही ऑफर माइलस्टोन ठरला. 

तिला.पहिल्याच चित्रपटात बॉलिवूडच्या किंगसोबत काम करण्याची संधी मिळत होती आणि हा चित्रपटही खूप गाजला होता. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एवढा हिट चित्रपट देऊनही दीपिका पादुकोणने या भूमिकेसाठी कोणतीही मानधन घेतलं नव्हतं. आज दीपिका एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये घेते आहे. 


 

Web Title: Know how much money Deepika received for her first film, who took crores for Jawan movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.