जेव्हा होणाऱ्या सासूने शत्रुघ्न सिन्हाला केले होते रिजेक्ट,हे होते कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 01:21 PM2021-11-05T13:21:46+5:302021-11-05T13:26:53+5:30
माझा भाऊ राम सिन्हा आणि दिग्दर्शक एनएन सिप्पी लग्नाची बोलणी करण्यासाठी माझा फोटो घेवून गेले.पूनमच्या आईने फोटो पाहूनच भयंकर चिडली होती.
बॉलिवूडमध्ये शॉटगनच्या नावाने प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा केला. वयाच्या 71 वर्षांच्या असल्या तरी आजही दिसायला तितक्याच सुंदर दिसतात. वाचून आश्चर्य वाटेल.1968 मध्ये पूनम यंग मिस इंडिया बनल्या होत्या. करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासूनच केली होती. त्यांनी काही चित्रपटांमध्ये कामही केले आहे. मात्र, लग्नानंतर फिल्मी करिअर सोडून संसारात रमल्या.9 जुलै 1980 रोजी शत्रुघ्न सिन्हासोबत लग्न करत संसार थाटला. मात्र, पूनमच्या आईला शत्रुघ्न पहिल्या नजरेत अजिबात आवडले नव्हते. त्यामुळे त्यांचा या लग्नाला विरोध होता.
शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम यांची पहिली भेट चित्रपटाच्या सेटवरच झाली होती. पहिल्या भेटीतच शत्रुघ्न पूनम यांच्या प्रेमात पडले होते. त्या काळात पूनम यांनाही चित्रपटात करिअर करायचे होते. दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एकदा शत्रुघ्न आणि पूनम ट्रेनने कुठेतरी जात होते. त्याचवेळी शत्रुघ्न यांनी खास फिल्मी स्टाईलने पूनम यांना प्रपोज केले होते. पूनम यांनाही शत्रुघ्न आवडत होते. शत्रुघ्न यांनी प्रपोज करताच पूनम यांनीही होकार दिला होता.
काही महिन्यांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी एका शोमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की,शत्रुघ्नसह पूनमचे लग्न व्हावे असे पूनमच्या आईला म्हणजेच माझ्या सासूला अजिबात वाटत नव्हते. माझा भाऊ राम सिन्हा आणि दिग्दर्शक एनएन सिप्पी लग्नाची बोलणी करण्यासाठी माझा फोटो घेवून पूनमच्या घरी गेले.पूनमच्या आईने फोटो पाहताच भयंकर चिडली होती. हा गुंडासारखा दिसतोय. चेहऱ्यावरही काळे डाग आहेत. माझी मुलगी दिसायला इतकी गोरीपान आणि सुंदर आहे. कुठे हा इतका काळा असे म्हणत दोघांच्या नात्याला नकार दिला होता. मात्र,पूनम यांना शत्रुघ्नसोबतच लग्न करायचे होते. मुलीच्या हट्टासमोर आईनेही लग्नाला नंतर होकार दिला होता.
रिना रॉय आणि शत्रुघ्न यांच्या अफेअरच्याही प्रचंड चर्चा झाल्या होत्या. मुळात पूनमसह लग्न झाल्याची गोष्टही शत्रुघ्न यांनी रिनापासून लपवून ठेवली होती. लग्नानंतरही दोघांचे अफेअर सुरु असल्याचे पूनम यांना माहिती होती. शेवटी पूनम यांनीच शत्रुघ्नला रिना पासून दूर राहायला सांगितले. असे केले नाही तर दोघांपैकी कोणाला एकाची निवड करावी लागेल असे त्यांनी शत्रुघ्न यांना सांगितले होते. ज्या मुलीवर विश्वास नाही अशा मुलीसोबत शत्रुघ्न यांनाही लग्न करायचे नव्हते. शेवटी त्यांनी रिना पासून दूरच राहण्याच निर्णय घेतला आणि तेव्हापासून पूनमसह दोघांचा सुखाने संसार सुरु झाला.