सासूबाई शर्मिला टागोर यांची आजही करिना कपूरला वाटते भीती, जाणून घ्या यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:14 PM2021-04-15T20:14:47+5:302021-04-15T20:22:46+5:30
करिना कपूरचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे ज्यात ती आपल्या सासूबद्दल बोलताना दिसत आहे.
सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी त्यांच्या दुसर्या बाळाचे स्वागत केले आहे. यादरम्यान सैफनेही कामातून ब्रेक घेत करीनाबरोबर पूर्णपणे वेळ एन्जॉय करत होता. करिनाचीही काळजी घेतल होता. अलिकडेच शर्मिला टागोर यांनी अजूनपर्यंत नातवाचा चेहरा देखील पाहिला नाहीय. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं त्यांना दिल्लीतून मुंबईत प्रवास करण्यासाठी मनाई करण्यात आली होती. त्यामुळं त्यांनी आपल्या नातवाची अद्याप भेट घेतलेली नाही.
शर्मिला टागोर सध्या पतौडी पॅलेसमध्ये राहत आहेत. कोरोना व्हॅक्सिन घेतल्यानंतर शर्मिला पतौडी पॅलेसमध्येच विश्रांतीसाठी गेल्या आहेत. काही महिने तरी शर्मिला तिथेच राहणार आहेत.दरम्यान करिना सासूबाई शर्मिला यांना खुप मिस करत असल्याचे म्हटले होते.कोरोना नंतर शर्मिला दिल्लीत राहत होत्या.त्यामुळे पूर्वीसारखा वेळ त्यांच्यासोबत घालवायला मिळाला नाही. गेल्या वर्षभरापासून त्या कुटुंबापासून दूर असल्याचेही करिनाने सांगितले होते.
तसेच करिना आणि शर्मिला यांच्या खूप चांगले बॉन्डींग असल्याचे पाहायला मिळते.करिनाचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे ज्यात ती आपल्या सासूबद्दल बोलताना दिसत आहे.शर्मिला यांना आजही करिना खूप घाबरत असल्याचे तिने या व्हिडीओत म्हटले आहे. काहीही सांगायचे असेल तर शर्मिला यांच्या भीतीपोटी ते सांगायचेच राहून जाते.
मुळात सासू सुनेप्रमाणे आमचे बॉन्डींग अजिबात नाही. शर्मिला मुलीप्रमाणेच माझी काळजी घेतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची त्या विशेष काळजी घेत असल्याचे करिनाने म्हटले आहे. शर्मिला टागोर यांच्या सारखी मला सासू मिळाली हे माझं भाग्यच असल्याचे मी समजते. तर इतरांसाठी शर्मिला टागोर या बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्री आहेत. सारेच त्यांच्यावर खूप प्रेम करतात.
शर्मिला यांना करिनाच नाहीतर सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंह देखील खूप घाबरायची. कुटुंबाला न सांगता सैफ अमृताचे लग्न करणे त्यांना अजिबात पटले नव्हते. त्यामुळे शर्मिला यांनी अमृताला कधीच शर्मिला यांनी सून म्हणून स्विकारले नाही.
अमृता शर्मिलासोबत एकटी जरी असली तरीही तिची बोलती बंद व्हायची. त्यामुळे सैफला तिने सासू शर्मिलाजवळ कधीच एकटीला सो़डू नकोस यासाठी विनवण्या करायची.