Ranbir Kapoor : रणबीर कपूरने चाहत्याचा काल फोन फेकला, आज सत्य आलं समोर; पाहा नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 08:09 PM2023-01-28T20:09:07+5:302023-01-28T20:28:18+5:30

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर नेहमी चर्चेत असतो. रणबीर शांत अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण, काल रणबीरचा संयम सुटला आणि तोही सर्व कॅमेऱ्यांसमोर.

know why ranbir kapoor threw the fan phone here is the reason | Ranbir Kapoor : रणबीर कपूरने चाहत्याचा काल फोन फेकला, आज सत्य आलं समोर; पाहा नेमकं काय घडलं

Ranbir Kapoor : रणबीर कपूरने चाहत्याचा काल फोन फेकला, आज सत्य आलं समोर; पाहा नेमकं काय घडलं

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नेहमी चर्चेत असतो. रणबीर शांत अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण, काल रणबीरचा संयम सुटला आणि तोही सर्व कॅमेऱ्यांसमोर. शुक्रवारी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ज्यामध्ये एक चाहता रणबीरसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता, रणबीरने न डगमगता होकार दिला, मात्र वारंवार क्लिक करूनही तो फोटो क्लिक झाला नाही, त्यामुळे रणबीर संतापला आणि फोनच फेकून दिला.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 

रणबीर कपूरचे असं संतापने पहिल्यांदाचा चाहत्यांसमोर आले आहे. हा व्हिडीओ पाहून  रणबीरच्या चाहते नाराज झाले. सोशल मीडियावर रणबीरला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले. पण,आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. एका व्हिडीओतून साऱ्यांचे दूध दूध आणि पानी का पानी झाले आहे.

कितने अजीब रिश्ते हैं यहां पर ! घटस्फोट घेतल्यानंतरही बॉलिवूडचे हे 7 कपल राहतात एकत्र, कारण....

हा सर्व प्रकार एका जाहीरातीचा भाग होता. पापाराझींसमोर खऱ्या जाहिराती करताना प्रसिद्धीची ही पद्धत आजमावली गेली. ज्याचा फोन रणबीर कपूरने टाकला होता, त्याचवेळी त्याला नवा फोन देऊन त्याची जाहिरात करण्यात आली होती.

मात्र, सोशल मीडियावर चाहत्यांनी आधीच याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली होती. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या 'तू झुठी मैं मकर' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. होळीच्या मुहूर्तावर 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: know why ranbir kapoor threw the fan phone here is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.