अजय देवगण सांगतो, काजोलला आवडत नाहीत ब्रँडेड गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 08:00 PM2018-12-03T20:00:00+5:302018-12-03T20:00:03+5:30

अजय देवगण आणि काजोल यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. अजयने या कार्यक्रमाच्या दरम्यान काजोल किती कंजुष आहे हे सगळ्यांना सांगितले. काजोलला स्वतःवर पैसे खर्च करायला आवडत नाहीत.

Koffee With Karan 6: Kajol is a low maintenance wife, Ajay reveals how she shops for cheap stuff online | अजय देवगण सांगतो, काजोलला आवडत नाहीत ब्रँडेड गोष्टी

अजय देवगण सांगतो, काजोलला आवडत नाहीत ब्रँडेड गोष्टी

googlenewsNext
ठळक मुद्देतिला महागडे गिफ्ट दिलेले आवडत नाहीत असे त्याने सांगितले. तसेच इतर सेलेब्सप्रमाणे ती ब्रँडच्या देखील प्रेमात नसल्याचे त्याने सांगितले. पूर्वी काजोल सांताक्रूझमधून शॉपिंग करत असे. पण आता ती अनेक गोष्टी ऑनलाइन मागवते. आमच्या घरी दररोज ५-६ पॅकेट तरी आलेले असतात आणि याची किंमत ६०० ते १२०० च्या दरम्यानच असते. तिला महागड्या वस्तू आवडत नाही. ती कधीच माझ्याकडे काहीही डिमांड करत नाही. काजोलच्या दर वाढदिवसाला मी तिला कार गिफ्ट करतो आणि ती मीच वापरतो असेही अजयने सांगितले.

अजय देवगण आणि काजोल हे रिअल लाईफ कपल सगळ्यांना आवडते. ही जोडी जिथे जाईल, तिथे चर्चेत येते. करण जोहरचा ‘कॉफी विथ करण 6’ हा शो सुद्धा याला अपवाद नाही. होय, अलीकडे अजय आणि काजोलने या शोमध्ये हजेरी लावली आणि मग काय, एकमेकांना चिडवणे, खिजवणे अशी धम्माल मस्ती रंगली.

अजय देवगण आणि काजोल यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. अजयने या कार्यक्रमाच्या दरम्यान काजोल किती कंजुष आहे हे सगळ्यांना सांगितले. काजोलला स्वतःवर पैसे खर्च करायला आवडत नाहीत. तसेच तिला महागडे गिफ्ट दिलेले आवडत नाहीत असे त्याने सांगितले. तसेच इतर सेलेब्सप्रमाणे ती ब्रँडच्या देखील प्रेमात नसल्याचे त्याने सांगितले. 

अजय काजोलविषयी ही गोष्ट सांगत असताना करणने देखील एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, लुईस व्युटन या कंपनीची बॅग करण एकदा काजोलला गिफ्ट म्हणून देणार होता तर त्या ब्रँडपेक्षा त्या बॅगला किती चैन असणार याची तिला काळजी लागली होती. त्यावर काजोलने सांगितले की, ती तिच्या प्रत्येक गोष्टी ती अतिशय सांभाळून वापरते. एवढेच नव्हे तर तिला कोणाकडून कोणती वस्तू घ्यायला आवडत नाही. तिची बहीण तनिशाकडून देखील ती काहीही घेत नाही. 

प्रत्येक सेलिब्रेटी ब्रँडेड कपडे वापरतात. पण काजोलला ब्रँडेड कपडे वापरायला आवडत नाही. ती केवळ सार्वजनिक ठिकाणी जाताना ब्रँडेड कपडे वापरते. इतरवेळी ती तिला कर्म्फटेबल असणारे कपडे घालते, ते कोणत्या ब्रँडचे नसतील तरी तिला चालतात. यावर काजोलने सांगितले, पैसे उधळण्यापेक्षा मला एफडी करायला आवडते. 

अजय सांगतो, पूर्वी काजोल सांताक्रूझमधून शॉपिंग करत असे. पण आता ती अनेक गोष्टी ऑनलाइन मागवते. आमच्या घरी दररोज ५-६ पॅकेट तरी आलेले असतात आणि याची किंमत ६०० ते १२०० च्या दरम्यानच असते. तिला महागड्या वस्तू आवडत नाही. ती कधीच माझ्याकडे काहीही डिमांड करत नाही. तिच्या दर वाढदिवसाला मी तिला कार गिफ्ट करतो आणि ती मीच वापरतो.

अजयचे हे संभाषण ऐकल्यावर तू खूपच भाग्यवान पती आहेस की, तुला इतकी चांगली पत्नी मिळाली असे करणने आवर्जून कार्यक्रमात सांगितले. 

 

Web Title: Koffee With Karan 6: Kajol is a low maintenance wife, Ajay reveals how she shops for cheap stuff online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.