Koffee With Karan 6 :अमृता सिंगबद्दल भरभरून बोलली करिना कपूर! वाचा काय म्हणाली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 11:51 AM2019-02-25T11:51:56+5:302019-02-25T11:52:58+5:30

‘कॉफी विद करण 6‘च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली आणि अनेक रहस्यांवरून पडदा उठला. याशिवाय करिनाने आणखी एक मोठा खुलासा केला. सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली.

Koffee With Karan 6: kareena kapoor khan opened about her bonding with amrita singh | Koffee With Karan 6 :अमृता सिंगबद्दल भरभरून बोलली करिना कपूर! वाचा काय म्हणाली!!

Koffee With Karan 6 :अमृता सिंगबद्दल भरभरून बोलली करिना कपूर! वाचा काय म्हणाली!!

googlenewsNext
ठळक मुद्देकार्तिक आर्यन व सारा अली खान लवकरच एका चित्रपटात दिसणार आहेत. हा एक बिग बजेट चित्रपट असेल, असा एक खुलासाही करिनाने या शोमध्ये केला.

कॉफी विद करण 6‘च्या फिनाले एपिसोडमध्ये करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी हजेरी लावली आणि अनेक रहस्यांवरून पडदा उठला. या एपिसोडमध्ये एकीकडे मलायका अरोरा व अर्जुन कपूरच्या अफेअरवर शिक्कामोर्तब झाले. तर दुसरीकडे कार्तिक आर्यन व सारा अली खानच्या आगामी चित्रपटाचाही खुलासा झाला. याशिवाय करिनाने आणखी एक मोठा खुलासा केला. सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग हिच्याबद्दल करिना बोलली. '



होय, करणने अमृता सिंगबद्दलकरिना कपूरला छेडले. अमृतासोबत तुझे नाते कसे आहे? असे करणने करिनाला विचारले. अमृताचा विषय करिना टाळेल, असे वाटत असताना करिनाने मात्र करणच्या प्रश्नाला अगदी बेधडक उत्तर दिले.  तिने सांगितले की,सैफसोबत लग्न झाले तेव्हापासून मी एकदाही अमृताला भेटलेले नाही. पण मी अमृताचा प्रचंड आदर करते. ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर मी एकदा अमृताला भेटले होते. त्यावेळी अमृता साराला घेऊन माझ्याकडे आली होती. सारा माझी खूप मोठा फॅन होती. तिला मला भेटायचे होते. त्यावेळी मी व अमृता एकमेकींशी बोललो होतो. माझे पती सैफ अली खानच्या दोन्ही मुलांचे संगोपण अमृताने एकटीने केले. मुलांना घडवण्याचे सगळे श्रेय तिचे आहे. त्यामुळेच तिच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. सैफने मला प्रपोज केले, त्यावेळी माझी दोन मुले आहेत आणि ते माझ्या जीवनाचा भाग आहेत, असे सांगितले होते, असेही तिने सांगितले.
कार्तिक आर्यन व सारा अली खान लवकरच एका चित्रपटात दिसणार आहेत. हा एक बिग बजेट चित्रपट असेल, असा एक खुलासाही करिनाने या शोमध्ये केला.

Web Title: Koffee With Karan 6: kareena kapoor khan opened about her bonding with amrita singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.