Koffee with Karan: अखेर अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रभासने केला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 11:57 AM2018-12-17T11:57:10+5:302018-12-17T11:58:04+5:30

होय, आम्ही बोलतोय ते ‘बाहुबली’ स्टार्स प्रभास, राणा दग्गुबती आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली. ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशात सर्वात मोठा वाटा असलेले हे स्टार्स ‘कॉफी विद करण’च्या सेटवर पोहोचले आणि मग काय, धम्माल झाली.

Koffee with Karan: Prabhas FINALLY opens up on his relationship with Anushka Shetty | Koffee with Karan: अखेर अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रभासने केला खुलासा!!

Koffee with Karan: अखेर अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रभासने केला खुलासा!!

googlenewsNext
ठळक मुद्देया शोमध्ये प्रभासने पहिल्यांदा आपले रिलेशनशिप स्टेट्सही जाहिर केले. होय, या शोचे काही प्रोमो रिलीज झाले आहेत आणि यात प्रभास आपल्या रिलेशनशिपवर बोलताना दिसतोय.

‘कॉफी विद करण’ या करण जोहरच्या सर्वाधिक लोकप्रीय चॅट शोमध्ये पहिल्यांदा साऊथ इंडस्ट्री्नच्या स्टार्सनी हजेरी लावली. होय, आम्ही बोलतोय ते ‘बाहुबली’ स्टार्स प्रभास, राणा दग्गुबती आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली. ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशात सर्वात मोठा वाटा असलेले हे स्टार्स ‘कॉफी विद करण’च्या सेटवर पोहोचले आणि मग काय, धम्माल झाली. या शोमध्ये प्रभासने पहिल्यांदा आपले रिलेशनशिप स्टेट्सही जाहिर केले. होय, या शोचे काही प्रोमो रिलीज झाले आहेत आणि यात प्रभास आपल्या रिलेशनशिपवर बोलताना दिसतोय.



आय एम सिंगल, असे प्रभास या प्रोमोमध्ये म्हणतोय. केवळ इतकेच नाही तर अनुष्का शेट्टीसोबतच्या अफेअरवरही प्रभास खुलासा करतोय. तुझ्या व अनुष्काच्या रिलेशनशिपच्या बातम्या आहेत, या करणच्या वाक्यावर तूच, या बातम्या पसरवल्यास, असे प्रभास म्हणतांना दिसतोय.



एकंदर काय तर ‘कॉफी विद करण’चे हे प्रोमो इंटरेस्टिंग आहेत. आता प्रोमो इतके इंटरेस्टिंग म्हटल्यावर अख्खा शो कसा असेल, तुम्ही अंदाज बांधू शकताच.
‘बाहुबली2’या चित्रपटातील प्रभास व अनुष्काची केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडली होती. याच चित्रपटानंतर दोघांच्याही अफेअरच्या बातम्यांना जोर चढला होता. दोघेही लग्न करणार, इथपर्यंत ही चर्चा पुढे गेली होती. मध्यंतरी प्रभास अनुष्काला भेटायला तिच्या सेटवर पोहोचला होता. याचे फोटोही व्हायरल झाले होते. पुढे अनुष्का प्रभासबद्दल बरीच पसेसिव्ह झाल्याचेही कानावर आले होते. पण या सगळ्या अफवा निघाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना प्रभासने अनुष्का त्याची केवळ चांगली मैत्रिण असल्याचे सांगितले होते. आम्ही ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि चांगले मित्र आहोत. आमच्या अफेअरच्या बातम्या ऐकून मी अनेकदा अचंबित होतो. या बातम्या इतक्या दाव्यानिशी सांगितल्या जातात की, अनेकदा मलाही आमच्यात काही आहेच, असा भास व्हायला लागतो, असे तो गमतीत म्हणाला होता.

Web Title: Koffee with Karan: Prabhas FINALLY opens up on his relationship with Anushka Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.