"मी त्यांच्यासोबत नव्हते पण...", अंकिताने शेअर केला वडिलांचा भावुक करणारा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 09:15 AM2024-10-14T09:15:42+5:302024-10-14T09:20:37+5:30

अंकिता वालावलकरने तिच्या वडिलांचा एक भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Kokan Hearted Girl Ankita Walawalkar Shares Emotional Video Of Her Father |mumbai |bigg Boss Marathi Season 5 | "मी त्यांच्यासोबत नव्हते पण...", अंकिताने शेअर केला वडिलांचा भावुक करणारा व्हिडीओ!

"मी त्यांच्यासोबत नव्हते पण...", अंकिताने शेअर केला वडिलांचा भावुक करणारा व्हिडीओ!

Ankita Walawalkar :महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची (Bigg Boss Marathi Season 5) चर्चा रंगली होती. पहिल्या दिवसापासून  'कोकण हार्टेड गर्लट अर्थात अंकिता वालावलकरने संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. या पर्वातील टॉप-५ मधील स्पर्धक अंकिता (Ankita Walawalkar) सध्या चर्चेत आहे. अंकिता वालावलकरने तिच्या वडिलांचा एक भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 

मुळची कोकणातील असलेल्या अंकिताला 'बिग बॉस'मध्ये प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळालं. 'बिग बॉस'च्या घरात ती कणखरपणे लढताना दिसून आली होती. पण,  जेव्हा तिचे वडील हे बिग बॉसमध्ये तिला भेटण्यासाठी पहिल्यांदा मुंबईत आले होते, तो क्षण तिच्यासाठी भावुक करणारा होता. मुंबईत आल्यावर अंकिताचे बाबा फक्त एक दिवस राहिले त्यानंतर पुन्हा कोकणात परतले. यावेळी त्यांनी एका दिवसात जेवढी जमेल तेवढी मुंबई पाहिली. याचच व्हिडीओ अंकिताने शेअर केला आहे. 


 अंकिता या व्हिडीओमध्ये म्हणते, "माझे बाबा मुंबईत आले तो क्षण पाहण्यासाठी मी त्यांच्याबरोबर नव्हते. पण, त्यांनी मुंबई थोडीफार त्यांना एका दिवसात जेवढं जमलं तेवढी पाहिली. त्यानंतर ते 'बिग बॉस'च्या घरात आले. खरंच हा क्षण मी आयुष्यात विसरू शकणार नाही. Bigg Boss मध्ये मला व्होट मिळावेत यासाठी बाबा स्वत: प्रयत्न करत होते ही माझ्यासाठी खरंच आश्चर्याची गोष्ट होती. स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या मुली कायम पहिल्या याव्यात म्हणून बाबांनी घेतलेला अभ्यास मला यानिमित्ताने आठवला. हे सगळं मी कधीच विसरू शकणार नाही. अर्थात तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे मी हे दिवस बघू शकतेय…त्यामुळे तुम्हा सर्वांचे देखील मनापासून आभार". याशिवाय अंकिताने कलर्स मराठी आणि बिग बॉसचेही आभार मानले आहेत. 

Web Title: Kokan Hearted Girl Ankita Walawalkar Shares Emotional Video Of Her Father |mumbai |bigg Boss Marathi Season 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.