कृती खरबंदा सांगते, कोणत्याही नायिकेसोबत नव्हे तर या नायकासोबत आहे माझी स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 07:15 AM2019-11-17T07:15:00+5:302019-11-17T07:15:01+5:30
कृती खररबंदाने हे सिक्रेट नुकतेच द कपिल शर्मा शो मध्ये सांगितले.
द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, कृती खरबंदा आणि उर्वशी रौतेला हजेरी लावली होती. हे सर्व कलाकार अनीस बझ्मी दिग्दर्शित ‘पागलपंती’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतील. या कार्यक्रमात शुटिंग दरम्यानचे काही किस्से ते या कार्यक्रमात सांगणार आहेत.
कलाकारांशी गप्पा मारताना कपिलने अभिनेत्यांकडून सेटवर सगळ्यात जास्त पागलपंती कोण करते हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर “अर्शद” असे उत्तर देण्यासाठी टीमने एक सेकंद देखील घेतला नाही. तथापि, अनीसने नमूद केले की अनिल सगळ्यात जास्त चक्रम आहे. एका मजेशीर प्रसंगाचे वर्णन करताना कृतीने सांगितले, “दृश्यामध्ये कोणीही असो, अनिल शूटच्या ठिकाणी जातो आणि म्हणतो, मी तुम्हा सगळ्यांना खलास केले. मुझे देखो कितना झकास लग रहा हूँ।” कृती पुढे सांगते, “या चित्रपटात तीन अभिनेत्री आहेत, पण मला केवळ या माणसासोबत (अनिल कपूर) स्पर्धा जाणवते.” जेव्हा अर्चना अनिलचे कौतुक करत होती तेव्हा अनिल उत्तरला, “मैं हिरो को ही नहीं हिरोइन को भी कॉम्प्लेक्स देता हूँ...” अनीस बझ्मी त्याच्या बहुतांशी सर्व चित्रपटांमध्ये अनिल कपूरची टर उडवतो हे कपिलने निदर्शनास आणून दिले. त्यावर कृती म्हटली की, “नक्कीच तो खूप महान अभिनेता आहे. त्यांच्याबद्दल सर्वोत्तम बाब ही आहे की ते सर्व कलाकारांना सतत तत्पर राहण्यास भाग पाडतात आणि काम सुरळीतपणे पार पाडतात.”
अनिल पूर्ण चित्रपटादरम्यान त्याच्या भूमिकेत अक्षरशः गुंतलेला असतो आणि आपली सर्व दृश्ये अतिशय चांगल्याप्रकारे करतो. संभाषण चालू ठेवत जॉनने ‘शूटआऊट ॲट वडाळा’ चित्रपटा दरम्यानचा अनिल कपूरसोबतचा अनुभव सांगितला. जॉनने सांगितले की, “चित्रपटात एक दृश्य होते ज्यामध्ये अनिलला मला त्याच्या बंदुकीने मारायचे होते. त्या ठराविक दृश्याचे शूटिंग करत असताना चुकून अनिलने माझ्या कानावर खर्या गोळ्या झाडल्या. त्या जखमेतून बरा होण्यास मला 2-3 दिवस लागले.”