क्रिती सनॉन 'बाहुबली' फेम या अभिनेत्याला करतेय डेट, 'कॉफी विद करण'मध्ये झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 06:27 PM2022-09-17T18:27:58+5:302022-09-17T18:28:42+5:30

Kriti Sanon: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनला तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडते. मात्र, सध्या ती बाहुबली चित्रपटातील या अभिनेत्याला डेट करत असल्याची बातमी समोर येत आहे.

Kriti Sanon is dating the actor of 'Baahubali' fame, she herself disclosed in 'Koffee with Karan' | क्रिती सनॉन 'बाहुबली' फेम या अभिनेत्याला करतेय डेट, 'कॉफी विद करण'मध्ये झाला खुलासा

क्रिती सनॉन 'बाहुबली' फेम या अभिनेत्याला करतेय डेट, 'कॉफी विद करण'मध्ये झाला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) तिच्या फिटनेस आणि चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. जरी अभिनेत्री तिचे वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवते. याच कारणामुळे बी-टाऊनमधील कोणत्याही अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचे नाव जोडले जात नाही. तसेच तिच्या डेटींगची बातमीही आली नाही. मात्र, आता क्रिती सेनन कोणाला डेट करत आहे हे समोर आले आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून बाहुबली फेम प्रभास (Prabhas) आहे.

खरेतर याची सुरुवात करण जोहर(Karan Johar)च्या 'कॉफी विथ करण ७' या शोमध्ये क्रिती सनॉननेप्रभासला केलेल्या कॉलने झाली. तेव्हापासून या दोघांच्या नात्याची सगळीकडे चर्चा आहे. त्याचबरोबर चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडते. बॉलिवूड लाइफच्या जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आदिपुरुषच्या सेटवर क्रिती सेनॉन आणि प्रभास यांच्यात पहिल्या दिवसापासून चांगले बॉण्डिंग झाले आहे. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले की स्वभावाने लाजाळू असूनही प्रभास क्रितीशी मनमोकळेपणाने बोलत आहे. मात्र, दोघांनाही आपलं नातं मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवायचे आहे. ते कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभास आणि क्रिती सेटवर एकमेकांसोबत छान टाइम स्पेंड करत असतात. दोघेही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करत असत. तसेच शूटदरम्यान एक टेक जास्तीत वेळा करण्याकडे त्यांचा जास्त कल असायचा. चित्रपटाचे शूटिंग संपून एक महिना झाला आहे. तरीदेखील त्यांच्यात चांगले बॉण्डिंग आहे. ते एकमेकांना फोन किंवा मेसेज करत राहतात. प्रभास आणि क्रितीला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात प्रभास राम आणि क्रिती सीतेच्या भूमिकेत आहे. आदिपुरुष जानेवारी २०२३ मध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Kriti Sanon is dating the actor of 'Baahubali' fame, she herself disclosed in 'Koffee with Karan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.