तब्बल 20 वर्षानंतर येणार RHTDM चा सीक्वल, फायनल झाले क्रिती सॅननचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:00 AM2021-03-11T08:00:00+5:302021-03-11T08:00:07+5:30

सीक्वलच्या गर्दीत आणखी एक सीक्वल, वाचा सविस्तर

kriti sanon to play lead role in sequel of rehna hai rehnaa hai terre dil mein |  तब्बल 20 वर्षानंतर येणार RHTDM चा सीक्वल, फायनल झाले क्रिती सॅननचे नाव!

 तब्बल 20 वर्षानंतर येणार RHTDM चा सीक्वल, फायनल झाले क्रिती सॅननचे नाव!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘रहना है तेरे दिल में’ हा दीया मिर्झा व आर. माधवनचा डेब्यू सिनेमा होता. या सिनेमाने सैफच्या करिअरलाही गती दिली होती.

बॉलिवूडच्या सर्वाधिक रोमॅन्टिक सिनेमांची यादी बनवायची झाल्यास, या यादीत एका सिनेमाचे नाव हमखास असेन. होय,  ‘रहना है तेरे दिल में’ या सिनेमाचे नाव. दीया मिर्झा, आर. माधवन आणि सैफ अली खानच्या दमदार अभिनयाने सजलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर भलेही फार कमाल दाखवू शकला नाही. पण 20 वर्षापूर्वी तरूणाईच्या मनात या सिनेमाने घर केले होते. या सिनेमाची गाणीही अपार लोकप्रिय झाली होती. आता इतक्या वर्षानंतर हा सिनेमा आठवण्याचे कारण काय तर या सिनेमाचा सीक्वल. होय, तब्बल 20 वर्षानंतर या सिनेमाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, ‘रहना है तेरे दिल में’चे निर्माते वासु भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी या सिनेमाचा सीक्वल बनवण्याच्या तयारीत आहे. अर्थात नव्या रंगरूपात आणि नव्या कास्टसह. खरे तर जॅकीला जुन्याच कलाकारांना घेऊनच हा सीक्वल बनवायचा होता. पण कदाचित सैफ व दीया यासाठी तयार नाही. त्यामुळे जॅकीने जुन्या कलारांऐवजी नव्या कलाकारांसह हा सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

चर्चा खरी मानाल तर, या सिनेमासाठी क्रिती सॅननचे नाव फायनल झाले आहे. तिच्या अपोझिट दोन हिरोंची निवड करण्यात येणार आहे. आता हे दोन हिरो कोण असतील, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे.

‘रहना है तेरे दिल में’ हा दीया मिर्झा व आर. माधवनचा डेब्यू सिनेमा होता. या सिनेमाने सैफच्या करिअरलाही गती दिली होती. आता या सिनेमाचा सीक्वल आजच्या तरूणाईला किती भावतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: kriti sanon to play lead role in sequel of rehna hai rehnaa hai terre dil mein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.