बॉलिवूड स्टार्सना शिव्या घालणाऱ्या KRK कडे बेसुमार संपत्ती, दुबईतील बंगला बघतच राहाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 05:20 PM2021-09-29T17:20:59+5:302021-09-29T17:27:50+5:30
कमाल राशिद खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने त्याच्या दुबईतील बंगल्याचे फोटो शेअर केले होते.
स्वयंघोषित सिने समीक्षक कमाल राशिद खान म्हणजे केआरके हा सोशल मीडियावरून सेलिब्रिटींबाबत अपमानजनक गोष्टी बोलण्यासाठी ओळखला जातो. याच कारणामुळे कमाल राशिद खान यांच ट्विटर हॅंडल ब्लॉक करण्यात आलं आहे. आता तो यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातुन हिंदी सिनेमांचे सुपरस्टार यांना शिव्या घालतो आणि त्यांच्या सिनेमांना शिव्या घालतो.
बेसुमार दौलत
कमाल राशिद खान याला जास्तीत जास्त लोक बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीका करण्यासाठी ओळखतात. पण तुम्हाला आहे का की, सोशल मीडियावरून बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या सिनेमांना शिव्या घालणाऱ्या कमाल राशिद खान याच्याकडे बेसुमार संपत्ती आहे. केआरकेने या गोष्टीचा खुलासा स्वत: एका पोस्टमधून केला होता.
दुबईच्या घराचे फोटो
कमाल राशिद खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने त्याच्या दुबईतील बंगल्याचे फोटो शेअर केले होते. त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं की, माझं दुबईतील घर. यात त्याने त्याचं घर जन्नतमधील मोठ्या रूम, स्वीमिंग पूल आणि लॉबी दाखवली होती.
काम काय करतो कमाल आर खान?
केआरकेला महागड्या आणि रॉयल गाड्यांचीही आवड आहहे. इंडिया डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार KRK कडे BMW 5 Series, Toyota Land Cruiser सारख्या गाड्या आहेत. इतकंच नाही तर कमाल आर खानचा गल्फ देशांमध्ये कपड्यांशी संबंधित बिझनेस आहे. कमाल बिग बॉसमध्येही दिसला होता. तर त्याने काही सिनेमेही बनवले होते. जे फ्लॉप झाले होते.
अजून बिझनेस
I am looking for an #IT company which can make our website (KRK Travels) where we will sell online air tickets. Capacity:- Per day sale approx 1 million Dhs.
— KRK (@kamaalrkhan) September 29, 2021
कमाल आर खानचं एक प्रॉडक्शन हाऊसही आहे. याद्वारे त्याने काही सिनेमेही तयार केले आहेत. पण सिनेमा बिझनेसमध्ये त्याला फारसा फायदा झालेला नाही. कमाल आर खान याने एक ट्विटही केलं होतं. याद्वारे त्याने सांगितलं की, होतं की तो एक वेबसाइट सुरू करत आहे. त्याच्या या नुकत्याच करण्यात आलेल्या ट्विटमद्ये त्याने लिहिलं होतं की, 'मी एका आयटी कंपनीच्या शोधात आहे. त्यांना KTK ट्रॅव्हल कंपनीची वेबसाइट डिझाइन करायची आहे. या वेबसाइटवरून आम्ही ऑनलाइन एअर तिकीटे विकू.