कुमार सानू, पौडवाल यांचा ब्रिटनमध्ये सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:43 AM2018-07-09T04:43:34+5:302018-07-09T04:44:00+5:30

भारतातील प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांना संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मानित करण्यात आले.

 Kumar Sanu, Anuradha Poudwal honored in Britain | कुमार सानू, पौडवाल यांचा ब्रिटनमध्ये सन्मान

कुमार सानू, पौडवाल यांचा ब्रिटनमध्ये सन्मान

googlenewsNext

लंडन : भारतातील प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांना संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबतच पत्रकार, संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संसद सदस्य आणि ‘इंडो- ब्रिटीश आॅल पार्टी पार्लिमेन्ट्री ग्रुप’चे अध्यक्ष वीरेंद्र शर्मा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी विशेषत: १९९० ते २००० या दशकात पार्श्वगायनाने आपली वेगळी छाप पाडली. भारत सरकारनेही या दोन गायकांना उत्कृष्ट पार्श्वगायक, पद्मश्री यासारख्या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
एशियन रेडिओचे प्रसिद्ध अँकर रे खान यांनी यावेळी कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांना प्रश्न विचारले. दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात या गायकांनी सुमधुर आवाजाने रंगत आणली.

Web Title:  Kumar Sanu, Anuradha Poudwal honored in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.