"मी खुप चिंतेत आहे", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 03:59 PM2021-07-01T15:59:38+5:302021-07-01T16:03:06+5:30
कुशल बद्रिके शूटिंगशिवाय ऑफस्क्रीन काय काय करतात हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते. सध्या सर्वच सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट असतात.
'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो. कुशल सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो. सोशल मीडियावरही तो चाहत्यांना मजेशीर पोस्ट करत मनोरंजक करत असतो.
कुशल बद्रिके शूटिंगशिवाय ऑफस्क्रीन काय काय करतात हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते. सध्या सर्वच सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट असतात. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर अनेक फॅन्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह त्यांचे विचार मांडत असतात. कुशल ब्रद्रिकेसुद्धा नेहमी त्याचे फोटो व्हिडीओ आणि त्याचे काही विचारही सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असतो.
नुकतेच कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, मी खुप चिंतेत आहे,जर मी व्यायाम आणी योगा चे फोटो पोस्ट केले नाहीत, तर हा सोशल मीडियाचा समाज मला स्वीकारेल का ???? कुशल ब्रद्रिकेची मजेशीर पोस्ट पाहून त्याचे चाहतेही त्याला मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसत आहेत.