त्यानंतर कधी काही कमी पडलं नाही...! श्रेया बुगडेच्या गिफ्टमुळे कुशल बद्रिकेचं आयुष्यचं बदललं...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 05:37 PM2021-11-17T17:37:16+5:302021-11-17T17:38:05+5:30

माझ्या आयुष्याचं सोनं करणारी बुगडे बाई...! कुशल बद्रिकेने श्रेया बुगडेसाठी लिहिली खास पोस्ट

kushal badrike share special post for shreya bugade |  त्यानंतर कधी काही कमी पडलं नाही...! श्रेया बुगडेच्या गिफ्टमुळे कुशल बद्रिकेचं आयुष्यचं बदललं...! 

 त्यानंतर कधी काही कमी पडलं नाही...! श्रेया बुगडेच्या गिफ्टमुळे कुशल बद्रिकेचं आयुष्यचं बदललं...! 

googlenewsNext

चला हवा येऊ द्या’ ( Chala Hawa Yeu Dya) या अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणा-या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक फिदा आहेत. मग तो भाऊ कदम असो, कुशल बद्रिके (Kushal Badrike )असो की श्रेया बुगडे (Shreya Bugde ). पण तूर्तास चर्चा आहे ती कुशल आणि श्रेयाच्या मैत्रीची. होय, कुशलने बुगडे बाईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ‘श्रेया बुगडे मी आणि योगायोग...,’ अशी त्याने लिहिलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.
श्रेयाने कुशलला भेट दिली आणि या भेटीने त्याचं पार आयुष्यचं बदललं..., असा कसं? तर त्यासाठी तुम्हाला कुशलची पोस्ट वाचावी लागेल.

कुशल लिहितो...

श्रेया बुगडे मी आणी योगायोग.
आमच्या team मधे सगळ्यांना gift देण्याची आवड श्रेयाला, तीला फक्त त्यासाठी निमित्त लागतं. एकदा मला एक Wallet gift करुन म्हणाली या पुढे हे wallet तुला कधीच काही कमी पडू देणार नाही आणी खरच त्यानंतर कधी काही कमी पडलं नाही, मागच्या दिवाळीत एक घड्याळ देऊन म्हणाली “your time starts now” आणी ह्या दिवाळीत माझा नवा सिनेमा पांडू” येतोय. (3 December ला)
मनापासून दिलेल्या शुभेच्छांच सोनं होतंच. माझ्या आयुष्याच सोनं करणारी ही, “बुगडे बाई” तुला खुप खुप प्रेम

कुशल व श्रेया दोघंही खूप चांगले मित्र आहेत. कुशलच्या वाढदिवसाला श्रेयानं भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यात कुशलला तिनं ‘माझ्या आयुष्यातील जीवनावश्यक’ म्हटलं होतं. मी जीव तोडून एखाद्यावर प्रेम कसं करावं, हे त्याकडून शिकलेय, आयुष्य कसं जगावं हेही, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
 

Web Title: kushal badrike share special post for shreya bugade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.