Laal Singh Chaddha: आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, OTTवर हीट...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 08:27 PM2022-10-13T20:27:15+5:302022-10-13T20:27:21+5:30
लाल सिंग चड्ढा जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिला जाणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.
Laal Singh Chaddha:आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा वर्षातील मोठ्या चित्रपटांपैकी एक होता, पण बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला. या चित्रपटाची चर्चा झाली, पहिल्याच दिवशी तो गाजलाही, पण समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने 100 कोटींचा गल्लाही जमवता आला नाही. कलेक्शनच्या बाबतीत चित्रपट डिझास्टर ठरला, पण OTT प्लॅटफॉर्मवर हिट झाला आहे. एवढंच नाही, तर जागतिक स्तरावर चित्रपट नंबर 2ला आला आहे.
आमिरचा चित्रपट धुमाकूळ घालतोय
'लाल सिंग चड्ढा' या महिन्याच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचू शकला नाही, पण ओटीटीवर तुफान चालतोय. मिळालेल्या माहितीनुसार, लालसिंग चड्ढा Netflix वर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रप ठरला आहे. तसेच, जागतिक स्तरावर चित्रपट क्रमांक 2 वर आहे.
चित्रपटाला किती व्हू मिळाले
'लाल सिंग चड्ढा' 6 ऑक्टोबर रोजी OTT वर प्रदर्शित झाला. स्ट्रीमिंग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 6.63 दशलक्ष तास पाहिला गेला आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रिय ठरलाय. नेटफ्लिक्सच्या मते, या चित्रपटाने मॉरिशस, बांगलादेश, सिंगापूर, बहरीन, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह जगभरातील 13 चित्रपटांपैकी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे.
अनेक चित्रपटांना प्रेक्षकांची दाद
या वर्षी अनेक चित्रपट आले, ज्यांना OTT वर चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये 'धाकड', 'अटॅक' आणि 'खुदा हाफिज 2'चा समावेश आहे. 'लाल सिंग चड्ढा' या सगळ्यांच्या पुढे आहे. भारताबाहेरही चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूडच्या क्लासिक 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदनने केले आहे.