लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 10:03 PM2024-10-09T22:03:46+5:302024-10-09T22:19:53+5:30

Kajol Body Fitted Dress Hot Bold Look Photos: काजोलने नुकताच एका अवार्ड सोहळ्यात हा क्लासिक लूक केला होता.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा सिंघम चित्रपट सध्या चर्चेत आहे. 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला. त्याचदरम्यान पत्नी काजोलचा एक लूक व्हायरल झालाय.

ELLE India Beauty Awards या पुरस्कार सोहळ्यात काजोलने केलेल्या लूकची सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चा सुरु आहे.

या कार्यक्रमासाठी काजोलने ग्लॉसी बॉडीकॉन ड्रेस निवडला अन् बोल्ड लूकने साऱ्यांना अवाक् केले. V-नेकलाइन आणि फुल स्लीव्हज बॉडीकॉन ड्रेसमध्ये काजोल खूपच हॉट दिसत होती.

काजोलने या बॉडी फिट ड्रेसमध्ये आपली फिगर फ्लाँट केली असून आपला लूक छान कॅरी केलाय. या लूकमध्ये काजोलने डायमंड ज्वेलरीही परिधान केलीय.

ड्रॉप इअररिंग्स, मॉडर्न टाइप्स इअर कफ्स यांच्यासह तिने दोनही हातात डायमंडच्या अंगठ्या घातल्यात अन् आपला ग्लॉसी लूक पूर्ण केलाय.

काजोलने ग्लॉसी बॉडीकॉन ड्रेस घालून त्यावर गोल्डन हिल्स घातलेत. त्याच्यासह तिने स्पेशल साइड-पार्टेड हेअरस्टाइल केली आहे.

काजोलने आपल्या ग्लॉसी लूकला फायनल टच देण्यासाठी त्यावर साजेसा असा लाइट ग्लॉसी मेकअप केलाय.

काजोलने केलेल्या या खास लूकची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. फॅन्स काजोलला 'रिअल लेडी सिंघम' म्हणत असून तिच्या पोस्टवर भरपूर कमेंट्स करताना दिसतायत. (सर्व फोटो सौजन्य- काजोल इन्स्टाग्राम)