22 वर्षाने गोरी मेम करतीये बॉलिवूडमध्ये कमबॅक; रिचल शैली करणार 'या' वेबसीरिजमध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 04:07 PM2023-07-07T16:07:59+5:302023-07-07T16:09:00+5:30

Rachel shelly:  तब्बल २२ वर्षानंतर ती बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करणार आहे.

lagaan actress elizabeth aka rachel shelly makes a comeback after 22 years from web series kohrra | 22 वर्षाने गोरी मेम करतीये बॉलिवूडमध्ये कमबॅक; रिचल शैली करणार 'या' वेबसीरिजमध्ये काम

22 वर्षाने गोरी मेम करतीये बॉलिवूडमध्ये कमबॅक; रिचल शैली करणार 'या' वेबसीरिजमध्ये काम

googlenewsNext

२००१ साली प्रदर्शित झालेला 'लगान' (Lagaan) सिनेमा साऱ्यांच्याच लक्षात आहे. या सिनेमातील आमिर खानची भूमिका आजही त्याच्या करिअरमधील सर्वात चांगल्या भूमिकांपैकी एक असल्याचं मानलं जातं. या सिनेमात त्याच्यासोबतच आणखी एक भूमिका गाजली ती म्हणजे गोरी मेमची. ही भूमिका अभिनेत्री रिचेल शैली (Rachel Shelley) हीने साकारली होती. या सिनेमानंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. गेल्या कित्येक वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र, आता  तब्बल २२ वर्षानंतर ती बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करणार आहे.  लवकरच ती एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

रिचेल लवकरच नेटफ्लिक्सच्या कोहरा या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजमध्ये ती मुख्य भूमिका साकारणार आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत बरुण सोबती, सुविंदर विक्की, वरुण बढोला आणि हरलीन सेठी ही कलाकार मंडळी झळकणार आहेत.

सुदीप शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये रिचेल हिला या सीरिजमध्ये का घेतलं यामागचं कारण सांगितलं. "रिचेलने यापूर्वी लगानमध्ये काम केलं आहे. त्यामुळे भारतीय कलाविश्वात कसं काम करतात याची तिला कल्पना आहे. आणि, ती उत्तमरित्या अभिनय करते", असं सुदीप शर्मा म्हणाले.

दरम्यान, कोहरा ही एक इंव्हेस्टिगेटिव्ह ड्रामा असलेली वेब सीरिज आहे. ज्यात एका एनआरआयचा लग्नाच्या एक दिवसापूर्वी मृत्यू होतो. तब्बल २२ वर्षाने रिचेल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्यामुळे तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
 

Web Title: lagaan actress elizabeth aka rachel shelly makes a comeback after 22 years from web series kohrra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.