'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्याने खरेदी केली नवीन गाडी; सेलिब्रिटींकडून कमेंट्सचा वर्षाव, फोटो समोर
By सुजित शिर्के | Updated: March 31, 2025 10:20 IST2025-03-31T10:12:39+5:302025-03-31T10:20:16+5:30
'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! किंमत वाचून थक्क व्हाल.

'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्याने खरेदी केली नवीन गाडी; सेलिब्रिटींकडून कमेंट्सचा वर्षाव, फोटो समोर
Rahul Magdum Post: यंदाचं नवीन वर्ष अनेक कलाकारांसाठी खास ठरलं आहे. काहींनी वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन घर घेतलं, काहींनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं तर काहींच्या घरी नव्या गाडीचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात आता आणखी एका अभिनेत्याने सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. हा अभिनेता म्हणजे राहुल मगदूम आहे. 'लागिरं झालं जी' या मालिकेतून अभिनेता राहुल मगदूम घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राहुलने त्याची ड्रीम कार खरेदी केल्याचं पाहायला मिळतंय.
'लागिरं झालं जी' या मालिकेतील राहुल्याच्या भूमिकेने अभिनेत्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. राहुलने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेता त्याच्या नव्या गाडीमुळे चर्चेत आला आहे. राहुल मगदूमने 'हुंडई आय-20' ही गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.राहुलने नव्या गाडीची पहिली झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. "सुख...", असं कॅप्शन देत त्याने आपल्या गाडीचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीची किंमत ८.२५ लाख इतकी आहे.
राहुलच्या नव्या गाडीच्या व्हिडीओवर निखिल चव्हाणने कमेंट करत, "खूप खूप अभिनंदन डार्लिंग...", असं म्हटलं आहे. तर, किरण ढाणे, नितीश चव्हाण,महेश जाधव या सगळ्या कलाकारांनी कमेंट्स करत त्याच्या या नव्या गाडीचं कौतुक केलं आहे.
वर्कफ्रंट
राहुल मगदूमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 'लागिरं झालं जी'मालिकेनंतर 'चला हवा येऊ द्या... शेलिब्रिटी पॅर्टन' या शोमध्ये सुद्धा तो झळकला आहे. या शिवाय राहुलने 'पळशीची पीटी' हा चित्रपटात देखील काम केलं आहे. सध्या तो सन मराठी वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत बलमा ही व्यक्तिरेखा साकारत आहे.