लैला, लिली अन् मस्तीजादे !

By Admin | Published: January 28, 2016 03:01 AM2016-01-28T03:01:40+5:302016-01-28T03:01:40+5:30

लोकांच्या टीकांचा चेहऱ्यावर लवलेशही न दिसू देणारी आणि अत्यंत आत्मविश्वासाने प्रत्येक नवीन आव्हानांना सामोरे जाणारी सनी लिओन ही आता बॉलीवूडचाच एक भाग झाली आहे.

Laila, Lily and Mastijade! | लैला, लिली अन् मस्तीजादे !

लैला, लिली अन् मस्तीजादे !

googlenewsNext

- लोकमतशी शेअर केला बॉलीवूडचा धाडसी प्रवास

लोकांच्या टीकांचा चेहऱ्यावर लवलेशही न दिसू देणारी आणि अत्यंत आत्मविश्वासाने प्रत्येक नवीन आव्हानांना सामोरे जाणारी सनी लिओन ही आता बॉलीवूडचाच एक भाग झाली आहे. पोर्न स्टार म्हणून असलेली इमेज तिने अतिशय कष्टाने पूर्णत: बदलली आहे. समीक्षक आणि तिचे फॅन्स या दोघांनीही तिला स्वीकारले आहे. तुम्ही तिचा द्वेष करू शकता, तिचे कौतुक करू शकता, पण तुम्ही अत्यंत देखण्या, उत्साही आणि कणखर स्वभावाच्या सनीला टाळू शकत नाही. बॉलीवूडच्या या हॉटेस्ट गर्लने बॉलीवूडमध्ये तिचा प्रवेश, सुरुवात, प्रवास याविषयी लोकमतशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याशिवाय ‘मस्तीजादे’ या चित्रपटाविषयीही तिने आपले मत व्यक्त केले.

तुझ्या ‘मस्तीजादे’ चित्रपटाविषयी सांग?
मस्तीजादे हा अ‍ॅडल्ट ह्युमर असणारा विनोदी चित्रपट आहे. तीन मुले आणि तीन मुलींची ही कथा आहे. यामध्ये माझी दुहेरी भूमिका आहे. लैला आणि लिली. लैला ही आकर्षक आहे. लिली ही मूर्ख स्वभावाची आहे. दोन्ही बहिणी अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या आहेत.

अ‍ॅडल्ट कॉमेडीसाठी भारतीय प्रेक्षक परिपक्व झालाय?
ग्रँड मस्ती हे अ‍ॅडल्ट कॉमेडीसाठीचे उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटाने १०० कोटींचा व्यवसाय केला आणि प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडला.

प्रतिकूल प्रतिक्रियांना तू कसे मॅनेज करतेस?
माझ्या पालकांनी मला अत्यंत कणखर आणि स्वतंत्र स्वरूपात वाढण्यास मदत केली. मला असा सल्ला देण्यात आला की, तुम्हाला कोणीही मदत करायला पुढे येणार नाही. तुम्ही स्वत: आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यामुळे मी माझ्या मनाप्रमाणे करते. लोक काय म्हणतात याचा विचार करीत नाही. किंबहुना, मी खूप संयमी आहे. मी खूप वैतागलेली आणि ओरडते आहे, असे कधीच होत नाही.

अभिनेत्री बनण्याची इच्छा होती?
पारंपरिक पंजाबी कुटुंबात मी वाढले. या कुटुंबात अभिनयाची चर्चा सोपी गोष्ट नव्हती. वयाच्या १८ व्या वर्षी मला जे काही वाटले, त्या पद्धतीने मी काम करण्यास सुरुवात केली अन् आज मला अभिनेत्री म्हणून ओळखले जात आहे.

बॉलीवूडमध्ये कसा प्रवेश केला?
मी बिग बॉस ५ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले. इथल्या लोकांच्या प्रतिक्रियांबाबत मी खूपच घाबरले होते. मनाचे समाधान झाल्यावर शेवटी मी या शोमध्ये काम करण्यास तयार झाले.

खऱ्या जीवनात सनी लिओनला काय आवडते?
मी अगदी सामान्य आहे. कोणत्याही गृहिणीप्रमाणे मी माझे काम करते. कामानंतर मी घरी जाऊन माझ्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालविते. माझ्या आवडीचे टीव्ही शोज पाहते. मी कोणत्याही पार्टीमध्ये जात नाही, मी ड्रिंक्स घेत नाही. मी अगदी कौटुंबिक मुलगी आहे.

सध्याच्या अभिनेत्रींमध्ये तुझी आवडती कोण?
मला आलियाला पाहणे आवडते. तिच्या चेहऱ्यावरील हास्य अत्यंत आकर्षक आहे. त्याशिवाय प्रियांका ही अगदी हुशार आहे.

मीडियाविषयीचे तुझे धोरण अडचणीचे वाटते का?
नकारात्मक गोष्टी नक्कीच माझ्यावर परिणाम करतात. तुमच्याविरुद्ध कुणी सतत बोलत असतील, तर तुम्हाला नक्कीच आवडणार नाही. तुम्हाला तुमचा कणखर चेहरा घेऊन वावरावे लागते आणि नकारात्मक प्रचाराविरुद्ध उभे राहावे लागते.

अत्यंत तणावग्रस्त दिवसानंतर तू स्वत:ला कशी फ्रेश करतेस?
माझे पती आणि मी अत्यंत घनिष्ठ मित्र आहोत. तणाव जाणवला की आम्ही एकत्र बसून चर्चा करतो. हे नाते अधिक कसे सुंदर करता येईल, यावर गप्पा होतात अन् तणाव कुठल्या कुठे पळून जातो.

सध्या तू काय करते आहेस?
माझ्याकडे दोन चित्रपट आहेत. ‘बेमान लव्ह’ आणि ‘वन नाइट स्टँड’. हे दोन्ही चित्रपट गंभीर स्वरूपाचे आहेत. यामध्ये नाट्य आणि रोमांच आहे. माझे प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून अशा चित्रपटाची वाट पाहत आहेत.

तू मराठी चित्रपट करशील?
हो... का नाही? जर चांगली कथा असेल तर मी आनंदाने काम करण्यास तयार आहे. मला अशी संधी मिळाली तर मी निश्चितपणे करीन.

Exclusive :

meha.sharma@lokmat.com

Web Title: Laila, Lily and Mastijade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.