'लाखात एक आमचा दादा' मालिका रंजक वळणावर, तुळजा आणि सूर्याचे वाद मिटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:02 IST2025-04-24T19:02:06+5:302025-04-24T19:02:42+5:30
'Lakhat Ek Dada' serial : 'लाखात एक आमचा दादा' मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील तुळजा आणि सूर्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते.

'लाखात एक आमचा दादा' मालिका रंजक वळणावर, तुळजा आणि सूर्याचे वाद मिटणार
'लाखात एक आमचा दादा' ('Lakhat Ek Dada' serial) मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील तुळजा आणि सूर्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते. तुळजाला जालिंदरवर संशय आहे म्हणून ती पोलिसांत तक्रार करते, घरातून दोन वेळा पैसे चोरीला गेल्यामुळे तिला हा संशय येतो. पोलिस जालिंदरच्या घरी येतात, सूर्याला गोष्ट कळताच तो ही तक्रार मागे घेतो. आणि शत्रु व तेजूला मांडव परतणीसाठी आमंत्रण देतो. पण सूर्याच्या तक्रार मागे घेण्यामुळे सूर्या आणि तुळजामध्ये खटके उडणार आहेत.
मांडव परतणीच्या वेळी काही खेळांचं आयोजन केलं जातं. खेळादरम्यान धनू जिम सिनाच्या गालावर किस करते आणि त्याला त्याची जुनी गर्लफ्रेंड आठवते आणि तो धनूला ढकलून देतो. धनू त्याला थेट सामोरी जाते तेव्हा तिला कळतं की त्याने हे लग्न फक्त स्वतःचं जिम उघडायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं आहे. एका कार्यक्रमात, सूर्याच्या उपस्थितीत जालिंदर महिलांच्या मर्यादा काय असाव्यात यावर मोठं भाषण देतो. सूर्या त्यांच्या विचारांशी सहमत होऊन राजूला व्यवसाय वाढवू नकोस असं सांगतो. यावर तुळजा, सूर्याला समजावण्याचा प्रयत्न करतेय. राजश्रीने तिच्या पंखांना विस्तार दिला तरी तिच्या आयुष्यावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. सूर्या तिचं म्हणणं मान्य करतो आणि "राजश्री प्रॉडक्ट्स" नावाने तिचा ब्रँड लॉंच करण्याचा निर्णय घेतो.
तेजू सांगेल का दादाला शत्रूचं सत्य?
तेजू, शत्रु आणि मंजुळाला रंगेहाथ पकडते आणि घर सोडायचं ठरवते. त्याच वेळी ती बेशुद्ध पडते आणि ति गरोदर आहे हे सर्वाना कळतं. पण तेजूला तिच्या गरोदरपणाचा तिटकारा वाटतो. सूर्या खूप खुश आहे, त्यामुळे ती शत्रुचं सत्य सांगू शकत नाही. जालिंदर ठरवतो की तेजूला आता विश्रांतीची गरज आहे म्हणून तिला शाळेत शिकवायला पाठवायचं नाही. आता दादाला शत्रूचं सत्य तेजू सांगेल? जालिंदर आपल्या डावात यशस्वी होईल ? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.